एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 15:37 IST2025-12-29T15:36:23+5:302025-12-29T15:37:41+5:30
कॉस्च्युम, लूक सगळंच ठरलं होतं; पण 'त्या' कारणामुळे अक्षयने सिनेमा सोडला

एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
एकीकडे 'धुरंधर'च्या यशामुळे चर्चेत असलेला अक्षय खन्ना सध्या 'दृश्यम' सिनेमाच्या मेकर्सच्या निशाण्यावर आहे. 'दृश्यम ३'मधून तो बाहेर पडला आहे. सिनेमासाठी त्याने जास्त मानधन मागितल्याने मेकर्सने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला अशी चर्चा झाली. मात्र अक्षयने 'धुरंधर'च्या रिलीजआधीच 'दृश्यम ३'सोडला होता असा खुलासा दिग्दर्शक अभिषेक पाठकने केला आहे. शिवाय आता त्याने अक्षय खन्नाला एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव असं आव्हान दिलं आहे.
इ टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक पाठक म्हणाला, "नोव्हेंबरमध्ये कॉन्ट्रॅक्ट साइन केल्यानंतर हे सगळं झालं. त्याने शूटिंग सुरु होण्याच्या पाच दिवस आधी सिनेमा सोडला. लूकही लॉक झाला होता, कॉस्च्युम बनले होते, नरेशन झालं होतं आणि त्याला आवडलंही होतं. धुरंधर रिलीजच्या एक दिवस आधी त्याने सिनेमा सोडला. त्याला सिनेमात विग घालायचा होता. मात्र दृश्यम २ जिथे संपला तिथूनच दृश्यम ३ सुरु होणार आहे. त्यामुळे अक्षयला मी विग घालायला परवानगी दिली नाही. मी त्याच्याशी चर्चा केली आणि त्याला समजावलं. पण त्याने ऐकलं नाही. आपण पुढे पाहू असं मी त्याला सांगितलं पण त्याने सिनेमा सोडला."
अक्षय खन्नाने 'दृश्यम ३'साठी २१ कोटींची मागणी केल्याचं वृत्तही अभिषेक पाठकने फेटाळून लावलं. अक्षयला शेवटी किती मानधनावर लॉक करण्यात आलं हे अभिषेकने रिव्हील केलं नाही. मात्र हा सगळा ड्रामा कॉन्ट्रॅक्ट साईन केल्यावरच सुरु झाला असं तो म्हणाला.
मला वाटतं अक्षयच्या आजूबाजूच्या लोकांनीच त्याच्या डोक्यात तो सुपरस्टार होईल असं भरवायला सुरुवात केली. मला वाटतं आता त्याने स्वत:साठी नक्की काय चांगलं आहे याचा विचार करावा. मी त्याला शुभेच्छा देतो. मला वाटतं त्याने आता एक सोलो सिनेमा करण्याचा प्रयत्न करावा. जेव्हा त्याच्याकडे काहीच उत्तर नसतं तेव्हा त्याला काय बोलायचं कळत नाही. हा अगदीच मूर्खपणा आहे कारण आम्ही एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखतो. मी त्याच्याशी बोलणं थांबवलं कारण एका पॉइंटला त्याच्याशी बोलून उपयोग नाही असं मला वाटलं. तो वेगळ्याच ग्रहावर आहे."
या सगळ्यावर अजय देवगणची काय रिअॅक्शन होती? यावर अभिषेक म्हणाला, 'त्याने सगळं माझ्यावरच सोडलं आहे. तसंही हे मी, अक्षय आणि प्रोडक्शन आमच्याबाबतच आहे.