बॉक्स ऑफिसवरील बॉलिवूडचा फुगा फुटला! 'दो और दो प्यार' आणि LSD2 सिनेमांनी पहिल्या दिवशी मिळूनही कमावले नाहीत १ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 02:09 PM2024-04-20T14:09:29+5:302024-04-20T14:09:48+5:30

Box Office Collection Day 1: 'दो और दो प्यार' आणि LSD2 ची बॉक्स ऑफिसवर फिकी जादू! पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' लाख

do aur do pyar and love sex dhoka 2 box office collection day 1 bollywood movies failed to collect 1 lakh | बॉक्स ऑफिसवरील बॉलिवूडचा फुगा फुटला! 'दो और दो प्यार' आणि LSD2 सिनेमांनी पहिल्या दिवशी मिळूनही कमावले नाहीत १ कोटी

बॉक्स ऑफिसवरील बॉलिवूडचा फुगा फुटला! 'दो और दो प्यार' आणि LSD2 सिनेमांनी पहिल्या दिवशी मिळूनही कमावले नाहीत १ कोटी

बॉक्स ऑफिसवर कायमच बॉलिवूड सिनेमांची चलती पाहायला मिळते. पण, गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिस सुस्तावल्याचं दिसत आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या बड़े मियां छोटे मियां आणि मैदान या दोन बिग बजेट सिनेमांना बॉक्स ऑफिसवर म्हणावं तसं यश मिळालं नाही. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमांचीही अशीच स्थिती आहे. 'दो और दो प्यार' आणि 'लव्ह सेक्स धोका २' हे दोन बॉलिवूड सिनेमे या आठवड्यात शुक्रवारी (१९ एप्रिल) प्रदर्शित झाले. पण, पहिल्या दिवशी या सिनेमांना मिळून १ कोटीचीही कमाई करता आलेली नाही. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरील बॉलिवूडचा फुगा फुटल्याचं चित्र आहे. 

विद्या बालन आणि प्रतीक गांधी मुख्य भूमिकेत असलेल्या 'दो और दो प्यार' सिनेमाची प्रेक्षक वाट पाहत होते. विवाहबाह्य संबंधांवर आधारित असलेल्या या सिनेमासाठी प्रेक्षक उत्सुक होते. पण, सिनेमागृहात प्रदर्शित होताच 'दो और दो प्यार' सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. ४० कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी केवळ ५० लाख रुपयांचा बिजनेस केला. 

तर दुसरीकडे एकता कपूरच्या 'लव्ह सेक्स धोका' या सिनेमाचा सीक्वलही प्रदर्शित करण्यात आला. 'लव्ह सेक्स धोका २' सिनेमाच्या प्रेक्षक प्रतिक्षेत होते. पण, या सिनेमालाही बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनाच्या दिवशी चांगली कमाई करता आलेली नाही. 'सॅकनिल्क'ने दिलेल्या रिपोर्टनुसार 'लव्ह सेक्स धोका २' सिनेमाने पहिल्या दिवशी केवळ १५ लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्यात हा सिनेमाही अपयशी ठरला आहे. 

२०१० मध्ये 'लव्ह सेक्स धोका' सिनेमाचा पहिला भाग प्रदर्शित करण्यात आला होता. आता तब्बल १४ वर्षांनंतर या सिनेमाचा सीक्वल प्रदर्शित करण्यात आला. पण, पहिल्या भागाप्रमाणे LSD 2 सिनेमाला प्रेक्षकांचं प्रेम मिळत असल्याचं चित्र दिसत नाहीये. आता वीकेंडला 'दो और दो प्यार' आणि 'लव्ह सेक्स धोका २' हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतात, हे पाहावं लागेल. 

Web Title: do aur do pyar and love sex dhoka 2 box office collection day 1 bollywood movies failed to collect 1 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.