'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेने पार केला ५०० भागांचा टप्पा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 02:28 PM2023-04-06T14:28:38+5:302023-04-06T14:32:28+5:30

माउली आणि त्यांची भावंडं, यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, सार्थ श्रीज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान हे सारं काही प्रेक्षकांना विशेष भावलं.

Dnyaneshwar Mauli marathi serial crossed the milestone of 500 episodes! | 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेने पार केला ५०० भागांचा टप्पा!

'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेने पार केला ५०० भागांचा टप्पा!

googlenewsNext

सोनी मराठी वाहिनीवरील 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेने संतांची परंपरा उलगडत प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं आहे. माउली आणि त्यांची भावंडं, यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, सार्थ श्रीज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान हे सारं काही प्रेक्षकांना विशेष भावलं. प्रेक्षक हरिभक्तीच्या या अलौकिक प्रवासाचे साक्षीदार झाले आहेत. मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळते आहे. आळंदीच्या ग्रामस्थांना माउलींच्या दिव्यत्वाचे दर्शन वेळोवेळी होते आहे. माउली आणि त्यांची भावंड यांचे चमत्कार ग्रामस्थांना पाहायला मिळाले. 

मालिकेत  माउली आणि त्यांची भावंडं यांच्याबरोबर संत सेना महाराज यांची भेट झाली. आत्तापर्यंत निरनिराळे संत आणि त्यांची मांदियाळी आपल्याला 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेतून पाहायला मिळाली असून मालिका आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेचे ५०० भाग पूर्ण होताहेत. माउलींचे चमत्कार आपल्याला यापुढेही पाहायला मिळतील. आता माउलींच्या कार्यात ग्रामजोशी पुन्हा अडथळा निर्माण करताना दिसणार आहेत. त्यांना माउली आणि त्यांची भावंडं कसे सामोरे जाणार, हे पाहायला मिळणार आहे.

'ज्ञानेश्वर माउली' मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाले असून येत्या रविवारी ९ एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वा. मालिकेचा महाएपिसोड सोनी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे. 
 

Web Title: Dnyaneshwar Mauli marathi serial crossed the milestone of 500 episodes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.