या फोटोंची बात काही औरच...! दिशाचे हॉट बिकिनी फोटो पाहून चाहते घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 01:09 PM2020-01-21T13:09:06+5:302020-01-21T13:10:01+5:30
बॉलिवूडची हॉट बाला दिशा पाटनी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. मग ते सोशल मीडियावरचे तिचे हॉट फोटो असो वा तिचे चित्रपट असो.
![disha patani malang bikini photo viral | या फोटोंची बात काही औरच...! दिशाचे हॉट बिकिनी फोटो पाहून चाहते घायाळ disha patani malang bikini photo viral | या फोटोंची बात काही औरच...! दिशाचे हॉट बिकिनी फोटो पाहून चाहते घायाळ](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/420x315/disha-patani_202001358450.jpg)
या फोटोंची बात काही औरच...! दिशाचे हॉट बिकिनी फोटो पाहून चाहते घायाळ
बॉलिवूडची हॉट बाला दिशा पाटनी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. मग ते सोशल मीडियावरचे तिचे हॉट फोटो असो वा तिचे चित्रपट असो. ट्विटरवर दिशा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आहे. दिशाने प्रियंका आणि दीपिकाला टक्कर देत 100 गुणांसह स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर ट्विटरवरच्या लोकप्रिय असलेल्या अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये नंबर वन स्थान पटकावलेय. सध्या दिशाची चर्चा होतेय ती ‘मलंग’च्या सेटवरच्या तिच्या हॉट फोटोंमुळे. होय,‘मलंग’च्या सेटवरचे बिकिनीतील सुपरहॉट फोटो दिशाने शेअर केले आहेत. लाल रंगाच्या बिकिनीमध्ये दिशा प्रचंड ग्लॅमरस दिसतेय.या फोटोमध्ये दिशा समुद्रात खेळताना दिसत आहे. दिशाने याआधी ही अनेकदा बिकिनीमधले बोल्ड फोटो इंस्टाग्राम अकांऊटवर शेअर केले आहे. पण तिच्या या फोटोंची बात काही औरच आहे.
नुकतेच,‘मलंग’ चित्रपटाचे टाइटल सॉन्ग प्रसिद्ध झाले. या गाण्याला चाहत्यांनी डोक्यावर घेतले आहे. या गाण्यामध्ये दिशा बोल्ड अवतारात दिसत आहे.
दिशा आणि आदित्य यांची प्रमुख भुमिका असलेला मलंग हा सिनेमा 7 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना दिशा आणि आदित्यचा रोमांस पाहिला मिळणार आहे.
‘मलंग’ हातावेगळा करताच दिशा ‘राधे’ या सिनेमाचे शूटींग सुरु करणार आहे. यात ती पुन्हा एकदा सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसेल. याआधी तिने सलमानसोबत ‘भारत’ चित्रपटामध्ये काम केले होते. मात्र भारत हा चित्रपट बाक्स आॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. पण ‘राधे’ या चित्रपटाबद्दल मात्र प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. हा चित्रपट सलमानच्या ‘तेरे नाम’चा सीक्वल असल्याचे म्हटले जात आहे. दिशाच्या या आगामी चित्रपटाला तिचे चाहते कसा सपोर्ट करतात आणि बाक्स आॅफिसवर हा चित्रपट किती कमाई करतो, हे कळेलच. त्याआधी दिशाच्या ‘मलंग’ने मात्र बाजी मारलीय.