मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 09:13 IST2025-06-16T09:13:16+5:302025-06-16T09:13:35+5:30

Malaika Arora and Arjun Kapoor : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर अनेक वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. आता मलायकाची एक पोस्ट चर्चेत आली आहे.

Did Malaika Arora and Arjun Kapoor patch up? This post sparks to netizen ask are they back together | मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) हे बी-टाउनमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होते. त्यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केले. मात्र, २०२४ मध्ये ते वेगळे झाले. दिवाळी पार्टीमध्ये ब्रेकअपच्या बातमीवर अर्जुन कपूरने सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया दिली. त्याने सांगितले की, तो अविवाहित आहे. दोघांच्या ब्रेकअपमुळे चाहते खूप नाराज झाले होते. परंतु, आता मलायकाच्या एका पोस्टमुळे दोघे पुन्हा एकत्र आल्याची बातमी चर्चेत आली आहे.

१५ जून रोजी मलायका अरोराने एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये ती नाईट-सूट घालून बाल्कनीत बसलेली दिसत आहे. याशिवाय तिने खाण्यापिण्याचे फोटोही शेअर केले. फोटोंमध्ये तिचा नो मेकअप लूक दिसत होता. फोटोंमध्ये मलायकाने व्हाईट हार्ट बनवले आहे. अर्जुन कपूरने हे फोटो लाईक केले आहेत. अर्जुन कपूरने हे फोटो लाईक केल्यापासून सोशल मीडियावर त्यांच्या पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. नेटकऱ्यांनी फोटोंवर कमेंट करत लिहिले की, अर्जुन परत आला आहे.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी २०१८ मध्ये डेट करायला सुरूवात केली होती. सुरुवातीला मलायका आणि अर्जुनने त्यांचे नाते खाजगी ठेवले होते. पण नंतर त्यांनी ते अधिकृत केले. दोघेही अनेकदा एकत्र दिसले. मलायका आणि अर्जुन हे पार्ट्यांपासून ते व्हॅकेशन्सपर्यंत एकत्र दिसले. पण, नंतर दोघांचेही ब्रेकअप झाले.

मलायका अरोराबद्दल बोलायचे झाले तर, तिने सलमान खानचा भाऊ अरबाज खानशी लग्न केले. मलायकाला अरबाजपासून एक मुलगा देखील आहे. मलायका आणि अरबाजचे १९९८ मध्ये लग्न झाले होते आणि २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 

Web Title: Did Malaika Arora and Arjun Kapoor patch up? This post sparks to netizen ask are they back together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.