रणवीर सिंहचा 'धुरंधर' सिनेमा दोन भागात येणार? तगड्या क्लायमॅक्ससह मेकर्सचा नवीन प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 12:48 IST2025-11-18T12:47:59+5:302025-11-18T12:48:26+5:30
'धुरंधर' सिनेमाची वाढली उत्सुकता, आज रिलीज होणार ट्रेलर

रणवीर सिंहचा 'धुरंधर' सिनेमा दोन भागात येणार? तगड्या क्लायमॅक्ससह मेकर्सचा नवीन प्लॅन
रणवीर सिंह आगामी 'धुरंधर' सिनेमामुळे चर्चेत आहे. आदित्य धर दिग्दर्शित या सिनेमात रणवीर सिंहसोबत अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर माधवन, संजय दत्त अशी तगडी स्टारकास्ट आहे. आज सिनेमाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज होणार आहे. त्यामुळे सर्वांनाची ट्रेलरची जाम उत्सुकता आहे. दरम्यान मीडिया रिपोर्टनुसार, रणबीर कपूरच्या 'रामायण' प्रमाणेच 'धुरंधर' सुद्धा दोन पार्ट्समध्ये रिलीज होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ५ डिसेंबर रोजी सिनेमाचा पहिला पार्टच प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.
'बॉलिवूड हंगामा'च्या रिपोर्टनुसार, 'धुरंधर' सिनेमा दोन भागांची कहाणी आहे. यामुळेच ५ डिसेंबर रोजी जो रिलीज होईल तो पहिला भाग असणार आहे. सिनेमाचा शेवट रंजक वळणावर होईल. यानंतर दुसरा भागात पुढील कहाणी पाहायला मिळणार आहे. आता पहिल्या भागाचा क्लायमॅक्स काय दाखवतात तसंच प्रेक्षकांना कोणत्या वळणावर खिळवून ठेवतात आणि पुढील भागाची किती वाट बघायला लावतात हे असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.
दिग्दर्शक आदित्य धरने मोठ्या स्केलवर सिनेमाचं शूट केलं आहे. यासोबतच सिनेमाची लांबीही मोठी आहे. म्हणूनच सिनेमा दोन भागांमध्ये केला गेला. या प्लॅननुसार 'धुरंधर'चा दुसरा भाग पुढील वर्षी रिलीज होईल. सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज होत आहे. दहशतवाद, काही खऱ्या घटना, रॉ संस्था आणि जागतिक संघर्षावर सिनेमा आधारित आगे.