भरघोस कमाई करणाऱ्या 'धुरंधर'चे ५० टक्के शो कमी झाले; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:14 IST2026-01-02T13:10:55+5:302026-01-02T13:14:53+5:30

बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणाऱ्या 'धुरंधर'चे ५० टक्के शो कमी झाले आहेत. काय आहे यामागील कारण

Dhurandhar movie 50 percent of the shows of the have been reduced after ikkis release | भरघोस कमाई करणाऱ्या 'धुरंधर'चे ५० टक्के शो कमी झाले; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

भरघोस कमाई करणाऱ्या 'धुरंधर'चे ५० टक्के शो कमी झाले; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या रणवीर सिंगच्या 'धुरंधर' (Dhurandhar) चित्रपटाविषयी एक मोठी बातमी समोर येत आहे. ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या धुरंधर'चे शो ५० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 'धुरंधर'चे शो कमी होण्यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या

मनीकंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, 'धुरंधर'चे शो कमी होण्याचं कारण ठरलाय नुकताच रिलीज झालेला 'इक्कीस' सिनेमा. 'धुरंधर' आणि 'इक्कीस' या दोन्ही चित्रपटांचे वितरण 'जिओ स्टुडिओज' करत आहे. 'धुरंधर'ने आतापर्यंत ऐतिहासिक कमाई केली असून तो आता पाचव्या आठवड्यात प्रवेश करत आहे. चित्रपट आधीच ब्लॉकबस्टर ठरल्यामुळे, आता नवीन चित्रपट 'इक्कीस'ला जास्तीत जास्त प्रेक्षक मिळावेत यासाठी जिओ स्टुडिओजने 'धुरंधर' चित्रपटाचे शो कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.



मुंबईसह अनेक शहरांतील सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये जिथे 'धुरंधर'चे दिवसाला ४ शो होत होते, तिथे आता फक्त २ शो होतील. उर्वरित २ शो 'इक्कीस'ला देण्यात आले आहेत. जिओ स्टूडिओज आणि  'धुरंधर'च्या टीमने घेतलेल्या या निर्णयामुळे दोन्ही सिनेमांना आर्थिक फायदा होईल, यात शंका नाही. 'इक्कीस'बद्दल सांगायचं तर, हा एक वॉर ड्रामा असून त्यात अगस्त्य नंदा आणि दिवंगत दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची मुख्य भूमिका आहे. तर 'धुरंधर' सिनेमात अक्षय खन्ना, रणवीर सिंग, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त असे एकापेक्षा एक कलाकार आहेत.

Web Title : धुरंधर के शो में कटौती: ' इक्कीस' का बॉक्स ऑफिस पर असर

Web Summary : रणवीर सिंह की 'धुरंधर' के शो में 'इक्कीस' की रिलीज के कारण 50% की कटौती हुई। दोनों फिल्मों का वितरण जियो स्टूडियोज द्वारा किया गया है। 'धुरंधर' की सफल दौड़ के बाद 'इक्कीस' को प्राथमिकता मिलती है।

Web Title : Dhurandhar's Shows Cut: ' इक्कीस' Impact on Box Office

Web Summary : Ranveer Singh's 'Dhurandhar' sees 50% show reduction due to 'Ikkis' release. Both films are distributed by Jio Studios. 'Ikkis' gets priority after 'Dhurandhar's successful run.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.