जान्हवी कपूरच्या परफेक्ट फिगरचं गुपित, रोज फॉलो करते हा डाएट प्लॅन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 16:22 IST2018-06-12T16:18:04+5:302018-06-12T16:22:01+5:30
अशात तिच्या परफेक्ट फिगरचं गुपित काय आहे हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे. चला जाणून घेऊया जान्हवीच्या परफेक्ट फिगरचं रहस्य....

जान्हवी कपूरच्या परफेक्ट फिगरचं गुपित, रोज फॉलो करते हा डाएट प्लॅन!
मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर आणि इशान खट्टरच्या 'धडक' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 2 मिनिट 46 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये जान्हवीच्या सुंदरतेने आणि फिटनेसने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. हा ट्रेलर रिलीज होण्यापूर्वीच जान्हवीच्या फिगरची कमालीची चर्चा होते. तिचे खास फोटोही सोशल मीडियात व्हायरल होत असतात. अशात तिच्या परफेक्ट फिगरचं गुपित काय आहे हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे. चला जाणून घेऊया जान्हवीच्या परफेक्ट फिगरचं आणि फिटनेसचं रहस्य....
जान्हवी कपूरचा डाएट प्लॅन
ब्रेकफास्ट - जान्हवी कपूर सकाळी नाश्त्याआधी 2 ग्लास पाणी पिते. त्यानंतर नाश्त्याला ब्राऊन ब्रेड, पीनट बटर, दुधासोबत ओट्स आणि अंड्याचा पांढरा भाग.
लंच - जान्हवी लंचमध्ये सॅलड, ब्राऊन राइस, चिकन सॅंडविच आणि फ्रूट खाते.
डिनर - रात्रीच्यावेळी ती हलके पदार्थ खाते. ती रात्री व्हेजिटेबल सूप,दाळ, सॅलड आणि हिरव्या भाज्या खाते.
जान्हवी कपूरचं जिम वर्कआउट
जान्हवी वर्कआउटसाठी नियमीत जिममध्ये जाते. जिममध्ये ती कार्डिओ एक्सरसाईज आणि वेटलिफ्टिंग करते. त्यासोबतच ती घरी स्विमिंग, योगा आणि जम्पिंग यांसारख्या अॅक्टिविटी करते.
फिट राहण्यासाठी जान्हवीच्या खास टिप्स
- रोज 10 ग्लास पाणी प्यावे.
- गोड पदार्थ आणि जंक फूड खाणे टाळा
- रोज वर्कआउट करा
- दारु आणि इतर नशेच्या पदार्थांचे सेवन करु नका
- रोज चाललं पाहिजे
यात जराही शंका नाहीये की, जान्हवीसारखं फिगर मिळवण्यासाठी तुम्हाला मेहनत करावीच लागेल. पण आजच्या धावपळीच्या जीवनात लोक आपल्या शरीर स्वास्थाकडे लक्ष देत नाहीत. पण काही यातील गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्हीही फिट राहू शकता.