दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 21:58 IST2025-09-03T21:58:21+5:302025-09-03T21:58:40+5:30

Ashish Kapoor arrested: कपूर आणि दोन अज्ञात पुरूषांनी या महिलेवर बलात्कार केल्याचे आरोप होता. सुरुवातीला महिलेने आपल्यावर आणखी एका महिलेने हल्ला केल्याचे म्हटले होते. परंतू नंतर तिने सर्व जबाब बदलत आशिष कपूरचे नाव घेतले होते. 

Delhi Police came to Pune, took away in handcuffs; tv Actor Ashish Kapoor arrested in rape case | दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक

दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक

दिल्लीतील एका घरात झालेल्या पार्टीमध्ये एका महिलेने अभिनेता आशिष कपूरने बलात्कार केल्याचा आरोप केला होता. गेल्या महिन्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आता दिल्ली पोलिसांनी पुण्यातून आशिष कपूरला अटक केली आहे. 

इन्स्टाग्रामवर ही पीडित महिला आणि आशिष कपूरची ओळख झाली होती. एका घरातील पार्टीमध्ये ते भेटले होते. महिलेने सुरुवातील अनेकांवर आरोप केले होते, नंतर तिने आशिष कपूरचे नाव घेतले होते. यानंतर आशिष कपूर बेपत्ता झाला होता. त्याच्या मागावर पोलीस होते. अखेर तो पुण्यात लपला असल्याचे पोलिसांना समजताच पोलिसांनी त्याला शोधत अटक केली आहे. 

कपूरनेच ही पार्टी आयोजित केली होती. कपूर आणि दोन अज्ञात पुरूषांनी या महिलेवर बलात्कार केल्याचे आरोप होता. सुरुवातीला महिलेने आपल्यावर आणखी एका महिलेने हल्ला केल्याचे म्हटले होते. परंतू नंतर तिने सर्व जबाब बदलत आशिष कपूरचे नाव घेतले होते. 

सीसीटीव्ही फुटेजनुसार कपूर आणि ती महिला एकत्रच बाथरुममध्ये गेले होते. ते बराच वेळ बाहेर आले नाहीत म्हणून इतरांनी बाथरुमचा दरवाजा ठोठावला. यानंतर हे दोघे बाहेर आले आणि नंतर महिलेने कपूरवर बलात्काराचे आरोप केले आहेत. 

Web Title: Delhi Police came to Pune, took away in handcuffs; tv Actor Ashish Kapoor arrested in rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.