दीपिका पादुकोणनं जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली, 'ही' कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 13:16 IST2025-07-03T13:15:09+5:302025-07-03T13:16:32+5:30

दीपिकानं आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव उंचावलं आहे. 

Deepika Padukone Receives Walk Of Fame Star In 2026 Becomes First Indian Actress To Get The Honour | दीपिका पादुकोणनं जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली, 'ही' कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय!

दीपिका पादुकोणनं जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली, 'ही' कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय!

Deepika Padukone Makes History: बॉलिवूडची 'मस्तानी' दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या प्रभावी अभिनयाने आणि अष्टपैलू योगदानाने केवळ भारतीय सिनेसृष्टीत नव्हे तर जागतिक स्तरावर स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलंय. ती केवळ एक स्टार नाही तर एक जागतिक आयकॉन बनली आहे. आता पुन्हा एकदा दीपिकानं आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव उंचावलं आहे. 

दीपिकाचा हॉलिवूड चेंबर ऑफ कॉमर्सने 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'मध्ये (Deepika Padukone Hollywood Walk of Fame) 'स्टार'नं गौरव केला आहे. विशेष म्हणजे, हा सन्मान मिळवणारी ती एकमेव भारतीय बनली आहे. दीपिका पदुकोणसोबत यंदा 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'मध्ये समाविष्ट झालेल्या कलाकारांमध्ये एमिली ब्लंट, राचेल मॅकअॅडम्स, डेमी मूर, रामी मालेक, टिमोथी चालमेट आणि स्टॅनली टुची यांसारख्या दिग्गजांची नावं आहेत. या प्रतिष्ठित सन्मानासाठीची निवड प्रक्रिया अत्यंत कठीण असते. दरवर्षी शेकडो नामांकने येतात, मात्र त्यामधून केवळ मोजक्याच कलाकारांची निवड त्यांचं योगदानाच्या आधारे केली जाते.

दीपिकाने अनेक वेळा देशाचं नाव उंचावलं आहे. २०१८ मध्ये टाइम मासिकाने तिला जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान दिलं होतं. त्यानंतर तिला TIME१०० इम्पॅक्ट पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर कतारमध्ये झालेल्या 'फिफा वर्ल्ड कप'च्या अंतिम फेरीत ट्रॉफीचे अनावरण करून तिने एक नवा इतिहास रचला होता आणि असं करणारी ती पहिली भारतीय ठरली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मानाव्यतिरिक्त, दीपिका मनोरंजन जगतात सतत वर्चस्व गाजवतेय. तिच्याकडे अनेक मोठे प्रकल्प असून बॉक्स ऑफिसवर तिची पकड मजबूत आहे. लवकरच ती दिग्दर्शक ॲटली कुमारच्या चित्रपटात ती थेट अल्लू अर्जूनसोबत दिसणार आहे. 

Web Title: Deepika Padukone Receives Walk Of Fame Star In 2026 Becomes First Indian Actress To Get The Honour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.