दीपिका पदुकोणच्या 'या' सवयीला कंटाळले नेटकरी, म्हणाले, "माहितीये तू प्रेग्नंट पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 07:23 PM2024-03-04T19:23:19+5:302024-03-04T19:26:25+5:30

प्रेग्नंट दीपिकावर नेटकरी का झाले नाराज?

Deepika Padukone posted pictures with back pose netizens fed up of it says plz change the pose | दीपिका पदुकोणच्या 'या' सवयीला कंटाळले नेटकरी, म्हणाले, "माहितीये तू प्रेग्नंट पण..."

दीपिका पदुकोणच्या 'या' सवयीला कंटाळले नेटकरी, म्हणाले, "माहितीये तू प्रेग्नंट पण..."

अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) काही दिवसांपूर्वीच गुडन्यूज दिली. काहीच महिन्यात दीपिका आई होणार असल्याचं तिने सोशल मीडियावर जाहीर केलं. यानंतर अभिनेत्रीवर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला. रणवीर आणि दीपिका या जोडीसाठी चाहते खूप खूश झाले. नुकतंच अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्याला दीपिकाच्या डान्सने लक्ष वेधलं. एकीकडे चाहते तिच्यासाठी खूश असतानाच दुसरीकडे नेटकरी तिच्या एका सवयीमुळे वैतागले आहेत. नक्की काय झालंय वाचा.

दीपिका पदुकोण सोशल मीडियावर नेहमी तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. वेगवेगळ्या अँगलने केलेल्या या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीच्या अदा बघायला मिळतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती केवळ पाठमोरे आणि साईड अँगलने काढलेले फोटोच पोस्ट करत आहे. मग तो काळ्या गाऊनमधला लूक असतो किंवा लाल साडीतला फोटो. यापैकी कोणताही फोटो फ्रंट अँगलने दिसत नाही. आता तर तिने प्रेग्नंसीची न्यूज सर्वांना दिलीच आहे मग का ती कॅमेऱ्यासमोरील अँगलने फोटोशूट करत नाही असाच प्रश्न चाहत्यांना पडलाय.

दीपिकाच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत लिहिले, 'आता सर्वांनाच माहित आहे तू प्रेग्नंट आहे. मग आता तुझे बॅक पोज बघून कंटाळा आला आहे', 'आता तरी पूर्ण वळून बघ, काही होत नाही तू सुंदरच दिसणार आहेस' असं म्हणत नेटकऱ्यांनी दीपिकाला सल्ले दिले आहेत. 

दरम्यान अंबानींच्या पार्टीत रणवीर -दीपिका जोडीने नेहमीप्रमाणेच लक्ष वेधून घेतलं. सर्वांसमोर रणवीरने दीपिकाच्या उजळलेल्या चेहऱ्याची स्तुती केली. तसंच दोघांनी स्टेजवर डान्स केला. दोघं दांडियाही खेळले. एका व्हिडिओत दीपिका खुर्चीत बसून खाण्यावर ताव मारतानाही दिसली. त्यांचे अनेक क्युट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

 

Web Title: Deepika Padukone posted pictures with back pose netizens fed up of it says plz change the pose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.