'स्पिरिट'मधून एक्झिट, आता दीपिका पादुकोणची ॲटलीच्या सिनेमात एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 13:27 IST2025-06-07T13:27:00+5:302025-06-07T13:27:24+5:30

'स्पिरिट'नंतर दीपिकाने 'कल्कि २'मधूनही एक्झिट घेतल्याचं बोललं जात होतं. आता दीपिकाची साऊथ दिग्दर्शक ॲटली कुमारच्या सिनेमात एन्ट्री झाली आहे.

deepika padukone entry in atlee kumar  AA22xA6 movie after exit from spirit | 'स्पिरिट'मधून एक्झिट, आता दीपिका पादुकोणची ॲटलीच्या सिनेमात एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर

'स्पिरिट'मधून एक्झिट, आता दीपिका पादुकोणची ॲटलीच्या सिनेमात एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण गेल्या काही दिवसांपासून स्पिरिट सिनेमामुळे चर्चेत आहे. संदीप वांगा रेड्डी यांच्या स्पिरिट सिनेमातून दीपिकाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. स्पिरिटनंतर दीपिकाने कल्कि २मधूनही एक्झिट घेतल्याचं बोललं जात होतं. आता दीपिकाची साऊथ दिग्दर्शक ॲटली कुमारच्या सिनेमात एन्ट्री झाली आहे. 

ॲटली कुमारच्या  AA22xA6 सिनेमात दीपिकाची एन्ट्री झाली आहे. या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत आहे. आता AA22xA6 सिनेमात दीपिकाचीही वर्णी लागली आहे. या सिनेमात दीपिका अल्लू अर्जुनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. दीपिकाचा सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत दीपिका ॲक्शन सीन्स करताना दिसत आहे. 


दीपिका आणि ॲटली यांचा हा दुसरा चित्रपट आहे. याआधी दीपिका अॅटली कुमारच्या जवान सिनेमात दिसली होती. या सिनेमात शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. दीपिका पहिल्यांदाच अल्लू अर्जुनसोबत काम करणार आहे. त्यामुळे ॲटली कुमारच्या  AA22xA6 सिनेमाच्या निमित्ताने अल्लू अर्जुन आणि दीपिका ही फ्रेश जोडी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. 

Web Title: deepika padukone entry in atlee kumar  AA22xA6 movie after exit from spirit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.