"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण

By कोमल खांबे | Updated: June 16, 2025 11:06 IST2025-06-16T11:05:54+5:302025-06-16T11:06:28+5:30

मालिकेत रुपाली भोसले ही संजनाची भूमिका साकारत होती. पण, त्याआधी ही भूमिका अभिनेत्री दिपाली पानसरे साकारत होती. मात्र अचानक दिपालीने मालिकेतून एक्झिट घेतली. यामागचं कारण आता तिने स्पष्ट केलं आहे.

deepali pansare revealed why she left aai kuthe kay karte played sanjana role | "आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण

"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण

'आई कुठे काय करते' ही मराठी टेलिव्हिजनवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेतील अरुंधतीचं प्रेक्षकांना जेवढं कौतुक वाटायचं. तेवढीच त्यांना अनिरुद्धवर प्रेम करणारी संजनाही भावली होती. मालिकेत रुपाली भोसले ही संजनाची भूमिका साकारत होती. पण, त्याआधी ही भूमिका अभिनेत्री दिपाली पानसरे साकारत होती. मात्र अचानक दिपालीने मालिकेतून एक्झिट घेतली. यामागचं कारण आता तिने स्पष्ट केलं आहे. 

दिपालीने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने आई कुठे काय करते मालिका मध्येच सोडण्याचं कारण सांगितलं. ती म्हणाली, "आई कुठे काय करते मालिका मला सोडायचीच नव्हती. कारण, तो माझा कमबॅक होता. रुहानच्या जन्मानंतर मी ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती माझी पहिली सिरीयल होती. मला तो रोल इतका आवडला होता. संजना मुद्दाम एखाद्या पुरुषाच्या मागे लागलेली असं नव्हतं. तिचा नवरा त्रास देणारा आहे, तिला एक मूल आहे आणि तिच्याकडे बोलायला कुणी नाही. म्हणून ती अनिरुद्धच्या प्रेमात पडली होती. संजनाचं कॅरेक्टर मला खूप आवडलं होतं". 


"पण, जेव्हा कोव्हिड आला, लॉकडाऊन लागलं. तेव्हा माझ्या घरी मुलाला सांभाळायला नॅनी होती. तेव्हा सतिश कौशिक यांच्या मुलीला कोव्हिड झाला होता. त्यांचा इंटरव्ह्यू मी पाहिला होता. त्यांनी सांगितलं होतं की कोव्हिड झालेल्या लहान मुलांवर उपचार करण्यासाठी भारतातील हेल्थ सिस्टिम तेवढी भक्कम नाही. मी माझ्या मुलीचे खूप हाल होताना बघितले, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर मी खूप घाबरले. आपण ७०-८० लोकांमध्ये काम करतो. त्यात दीड-दोन वर्षांचं मूल ज्याला मी घरात कोंडून ठेवलंय. त्यामुळे त्या गोष्टीची मला भीती होती की माझ्यामुळे याला कोव्हिड व्हायला नको. लॉकडाऊन उघडल्यानंतरही मी काही दिवस शूटला जात होते. पण, नंतर मी घाबरले. मालिकेचं नावच होतं की आई कुठे काय करते आणि आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते. म्हणून मी ती सिरीयल सोडली. पण, त्यानंतर मी सिरीयल बघितलीच नाही", असं दिपालीने सांगितलं. 

Web Title: deepali pansare revealed why she left aai kuthe kay karte played sanjana role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.