'रंग माझा वेगळा'मधील दीपाने शेअर केला नो मेकअप लूक, फोटोवर चाहते म्हणताहेत - लय भारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 07:00 AM2021-10-28T07:00:00+5:302021-10-28T07:00:00+5:30

रेश्माला दीपाच्या भूमिकेत प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे.

Deepa from 'Rang Mazha Vegla' shared No Makeup Look, fans say on the photo - the rhythm is huge! | 'रंग माझा वेगळा'मधील दीपाने शेअर केला नो मेकअप लूक, फोटोवर चाहते म्हणताहेत - लय भारी!

'रंग माझा वेगळा'मधील दीपाने शेअर केला नो मेकअप लूक, फोटोवर चाहते म्हणताहेत - लय भारी!

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' मालिकेने अल्पावधीतच चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेचे कथानक आणि यातील पात्रांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. या मालिकेतील दीपाने आपल्या प्रेमळ स्वभावाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने निभावली आहे. रेश्माला दीपाच्या भूमिकेत प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे. 

रेश्मा शिंदे खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे आणि ती सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे फॅन्सदेखील फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. नुकताच तिने नो मेकअप लूकमधील फोटो शेअर केला आहे आणि म्हटले की, स्माईल एक असे वळण आहे जे सर्व काही ठीक करतो. रेश्माच्या या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होताना पहायला मिळतो आहे. एका युजरने म्हटले की, लय भारी दिसतेस, तर दुसऱ्या युजरने लिहिले की, खूप सुंदर. 


रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. रंग माझा वेगळा या मालिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. तिने हिंदी मालिकेतही काम केले आहे.  नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत ती झळकली आहे. 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत तिने प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातही ती झळकली आहे. 

Web Title: Deepa from 'Rang Mazha Vegla' shared No Makeup Look, fans say on the photo - the rhythm is huge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.