४० वर्षीय अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, दोन मुलांच्या वडिलांसोबत घेतले सात फेरे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 05:42 PM2023-03-18T17:42:22+5:302023-03-18T17:46:25+5:30
सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत
![Daljeet kaur tied a know with nikhil patel photo video on internet | ४० वर्षीय अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, दोन मुलांच्या वडिलांसोबत घेतले सात फेरे Daljeet kaur tied a know with nikhil patel photo video on internet | ४० वर्षीय अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, दोन मुलांच्या वडिलांसोबत घेतले सात फेरे](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/420x315/daljeet-2_202303983997.jpeg)
४० वर्षीय अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, दोन मुलांच्या वडिलांसोबत घेतले सात फेरे
मेहेंदी, हळदी आणि संगीत सेरेमनीनंतर दलजीत कौर Daljeet Kaurचे निखिल पटेल(Nikhil Patelसोबत लग्नगाठ बांधली आहे. अनेक महिन्यांपासून अभिनेत्री या क्षणाची वाट पाहत होती. यासाठी ती उत्साहित होती. तसेच ती खूप नव्हर्ससुद्धा होती. तिने आपल्या लग्नाबद्दल इंस्टाग्रामवर आणि अनेक मुलाखतींमध्ये चर्चा केली. हळद आणि मेहंदीची सर्व फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले होते. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत
व्हाईट कलरचा लेहेंगा आणि लाल चुन्नीमध्ये अभिनेत्री दलजीत कौर खूपच क्युट आणि आनंदी दिसत आहे. त्याचबरोबर निखिल पटेलनेही व्हाईट रंगाची शेरवानी घातली आहे. मुलगा जेडनही या लग्नाच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीच्या या खास सोहळ्याला करिश्मा तन्ना, सनाया इराणी, सुनैना फौजदार, प्रणिता पंडित, रिद्दी डोगरा आदी पोहोचले होते.
गेल्या वर्षी दुबईत मित्राच्या पार्टीत दलजीत पहिल्यांदा निकला भेटली होती. त्या काळात दोघेही फक्त मुलांबद्दल बोलायचे आणि कुणाच्याही मनात प्रेमाची भावना नव्हती. दोघेही काळाच्या ओघात प्रेमात पडले. जवळपास एक वर्ष निखिलसोबत रिलेशनशिपमध्ये दलजीतने लग्नाचा निर्णय घेतला आहे.
अभिनेत्रीचे यापूर्वी शालीन भनोटसोबत लग्न झाले होते. 2009 मध्ये दोघांचे लग्न झाले होते, मात्र त्यानंतर लगेचच दलजीत आणि शालीन यांच्यात भांडणाच्या बातम्या येऊ लागल्या. हे भांडण इतके वाढले की अखेर 2013 मध्ये दोघांनी आपले मार्ग वेगळे केले.