तुम्ही एका महान कवीचे पुत्र आहात तेव्हा..., चाहत्यानं लक्षात आणून दिली अमिताभ बच्चन यांची चूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 19:47 IST2021-10-19T19:46:32+5:302021-10-19T19:47:47+5:30
अशी काय चुक झाली की, महानायकाला मागावी लागली माफी

तुम्ही एका महान कवीचे पुत्र आहात तेव्हा..., चाहत्यानं लक्षात आणून दिली अमिताभ बच्चन यांची चूक
महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. जगाच्या पाठीवर त्यांचे असंख्य चाहते आहेत़. मोठा पडदा असो की छोटा पडदा अमिताभ यांच्या विलक्षण प्रतिभेने प्रेक्षक मंत्रमुग्ध होतो़. त्यांच्या असण्यानं भारावून जातो. ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवरचा त्यांचा वावर, त्यांचा भारदस्त आवाज ऐकून प्रेक्षक दिपून जातात. सोशल मीडियावरही ते प्रचंड सक्रिय आहेत़. चाहते त्यांच्या पोस्टला भरभरून दाद देतात़. अर्थात काही ट्रोल करणारेही असतात आणि काही चुका लक्षात आणून देणारेही़. अलीकडे एका चाहत्यानं अमिताभ यांची चूक नेमकी पकडली आणि ती त्यांच्या लक्षात आणून दिली. आता ती चूक काय तर त्यासाठी तुम्हाला पुढची बातमी वाचावी लागेल.
तर अलिकडेच दस-याच्या दिवशी अमिताभ यांनी चाहत्यांना शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली़. परंतु ही पोस्ट शेअर करताना त्यांच्याकडून अजाणतेपणी एक चूक झाली. फेसबुकवर त्यांना फॉलो करणा-या पटना येथील राजेश पांडे यांनी बिग बींना त्यांची चूक लक्षात आणून दिली़. ‘सर तुम्ही,पोस्टमध्ये दशहरा हा शब्द दशहेरा असा लिहिला आहे,’ असं त्यांनी बिग बींच्या लक्षात आणून दिल. इतकंच नाही अमिताभ यांच्याच ‘खुदा गवाह’ या सिनेमातील एका संवादमधील एक चूक सुद्धा त्यांनी बिग बींच्या निदर्शनास आणून दिली़. ‘खुदा गवाह या सिनेमात तुम्ही एक संवाद म्हटला आहे. त्यात तुम्ही पेशेवर मजुरिम असे म्हणण्या ऐवजी पेशावर मुजरिम असे म्हटले आहे,’ असं या चाहत्याने सांगितलं. तुम्ही एका महान कवीचे पुत्र आहात. कमर्शिअल अॅडचे जाऊ द्या पण किमान वर्तनात तरी चुकू नका, असा सल्लाही या चाहत्याने दिला.
आता ही चूक निदर्शनास आणून दिल्यावर बिग बींनी काय करावं? तर त्यांनी माफी मागितली़.
होय, या चुकीबद्दल बिग बींनी हात जोडलेल्या इमोजीसह क्षमायाचना केली. झालेल्या चूकीबद्दल क्षमा मागतो. मी सुधारणा करेल़. माझी चूक माझ्या लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद, असे बिग बींनी म्हटलं.