Zubeen Garg Death: झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 12:48 IST2025-10-04T12:47:10+5:302025-10-04T12:48:12+5:30
Zubeen Garg Death Reason: सिंगर झुबीन गर्गच्या मृत्यूप्रकरणात आता एक नवीन ट्विट आला आहे.

Zubeen Garg Death: झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा
Zubeen Garg Death: सिंगर झुबीन गर्गच्या मृत्यूप्रकरणात आता एक नवीन ट्विट आला आहे. झुबीन गर्गच्या म्युझिक बँडचे सदस्य शेखर ज्योती गोस्वामी यांनी मॅनेजर आणि फेस्टिव्हल ऑर्गनायझरने झुबीनला विष दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. गोस्वामी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांना वाटतं की झुबीनचा मॅनेजर सिद्धार्थ शर्मा आणि फेस्टिव्हल ऑर्गनायझर श्यामकानु महंत यांनी त्याला विष दिलं आणि त्याचा मृत्यू अपघाती असल्याचं दाखवून हे लपवण्याचा प्रयत्न केला
पोलीस सध्या या धक्कादायक दाव्याची चौकशी करत आहेत. गोस्वामी यांनी तपासकर्त्यांना सांगितलं की, सिंगापूरमध्ये गर्गच्या मृत्यूपूर्वी शर्माचे वर्तन संशयास्पद होतं. एफआयआरमध्ये शर्मावर गंभीर अजामीनपात्र आरोप लावण्यात आले आहेत, ज्यात गुन्हेगारी कट, हत्या आणि सदोष मनुष्यवध याचा समावेश आहे. झुबीन गर्गच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी आसाम सरकारने न्यायालयीन आयोग स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हे आयोग संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल आणि झुबीन गर्गचा मृत्यू कसा झाला आणि त्याच्या मृत्यूमागील कारणे शोधण्याचा प्रयत्न करेल.
"७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक
जवळच्या सहकाऱ्यांचीही चौकशी
झुबीन गर्गच्या मृत्यूची चौकशी सीआयडी देखील करत आहे. आसाम सीआयडीचे विशेष तपास पथक (एसआयटी) या प्रकरणाचा तपास करत आहे. सीआयडीने या प्रकरणात फेस्टिव्हल ऑर्गनायझर श्यामकानू महंत याचीही चौकशी केली आहे. झुबीनचा मॅनेजर सिद्धार्थ शर्मा याचीही सीआयडीने तासन्तास चौकशी केली. सीआयडीने या प्रकरणात झुबीनच्या अनेक जवळच्या सहकाऱ्यांचीही चौकशी केली आहे.
स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
सिंगर झुबीन गर्गच्या मृत्यूने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. मात्र सिंगरच्या मृत्यूबाबत एक मोठी अपडेट समोर आली. मीडिया रिपोर्ट्समध्ये झुबीन गर्ग याचा स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर सिंगापूरमधील एका बेटावर बुडून मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.
आसामचा रहिवासी असलेल्या झुबीनचा १९ सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये मृत्यू झाला. द स्ट्रेट्स टाईम्समधील रिपोर्टनुसार, सिंगापूर पोलीस दलाने (एसपीएफ) सांगितलं की झुबीनचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि प्राथमिक तपासाचे निकाल भारतीय उच्चायुक्तालयाला सादर करण्यात आले आहेत. सूत्रांच्या हवाल्याने रिपोर्ट गायकाचा बुडून मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. एसपीएफने यापूर्वी स्पष्ट केलं होतं की, झुबीनच्या मृत्यूमध्ये कट किंवा घातपाताची शक्यता नाही.