रितेश देशमुखने दाखवला मनाचा मोठेपणा, शाहरुख खान झाला भावूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 15:18 IST2018-11-06T15:17:54+5:302018-11-06T15:18:50+5:30
होय, शाहरुखच्या ‘झिरो’ या चित्रपटासाठी रितेशने आपल्या ‘माऊली’ या चित्रपटाची रिलीज डेट बदलली आणि रितेशचा हा मनाचा मोठेपणा पाहून किंगखान भावूक झाला.

रितेश देशमुखने दाखवला मनाचा मोठेपणा, शाहरुख खान झाला भावूक!
बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खानने अभिनेता रितेश देशमुखचे खास आभार मानले आहेत. यामागे कारणही तसेच आहे. होय, शाहरुखच्या ‘झिरो’ या चित्रपटासाठी रितेशने आपल्या ‘माऊली’ या चित्रपटाची रिलीज डेट बदलली आणि रितेशचा हा मनाचा मोठेपणा पाहून किंगखान भावूक झाला. त्याने टिष्ट्वटरवर रितेशचे विशेष आभार मानले. ‘आज लहान भाऊ खूप मोठा झाला. तू दाखवलेला मनाचा मोठेपणा, मला दिलेला आदर याबद्दल मी काय बोलू. माझ्यासाठी स्वत:च्या गरजा बाजूला ठेवणारा तुझ्यासारखा मित्र मला मिळाला, याचा मला आनंद आहे,’ असे शाहरुखने आपल्या टिष्ट्वटमध्ये लिहिले आहे.
शाहरुखचा ‘झिरो’ हा चित्रपट येत्या २१ डिसेंबरला प्रदर्शित होतो आहे. रितेशचा ‘माऊली’ही याच दिवशी रिलीज होणार होता. पण असे झाले असते तर या बॉक्सआॅफिस संघर्षामुळे ‘झिरो’च्या कमाईवर बराच नकारात्मक परिणाम झाला असता. कारण रितेश हे महाराष्ट्रातील एक मोठे नाव आहे. अशास्थितीत ‘माऊली’ आणि ‘झिरो’ एकाच दिवशी बॉक्सआॅफिसवर धडकले असते तर महाराष्ट्रातील ‘झिरो’च्या बिझनेसला याचा जोरदार फटका बसला असता. रितेशने ‘माऊली’ची रिलीज डेट बदलल्यामुळे हे नुकसान टळले आहे. साहजिकचं शाहरुखसाठी हा मोठ्ठा दिलासा आहे.
I love you @iamsrkhttps://t.co/Acuea9V5Lq
— Riteish Deshmukh (@Riteishd) November 5, 2018
‘झिरो’ या चित्रपटाकडून शाहरुखला मोठ्या अपेक्षा आहेत. अलीकडच्या काळात शाहरूखच्या चित्रपटांना फार यश मिळवता आले नाही. ‘झिरो’द्वारे यशस्वी कमबॅक करण्याचा शाहरुखचा इरादा आहे. सध्या त्याच्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत कॅटरिना कैफ व अनुष्का शर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
‘माऊली’ या सिनेमात रितेश मुख्य भूमिकेत असून सय्यामी खेर त्याच्या नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार याने केले आहे.या सिनेमाची कथा क्षितीज पटवर्धन याने लिहिली असून रितेशचं या चित्रपटाचा निर्माता आहे. सय्यामी ‘माऊली’द्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असली तरी तिची बहीण संस्कृती मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षांपासून काम करत आहे.