Zero Trailer Out : शाहरूख खानचा आगामी चित्रपट 'झिरो'चा ट्रेलर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 17:19 IST2018-11-02T17:19:04+5:302018-11-02T17:19:45+5:30
शाहरूख खानचा बहुचर्चित चित्रपट 'झिरो'चा ट्रेलर त्याच्या वाढदिवसादिवशी प्रदर्शित करण्यात आला आहे.

Zero Trailer Out : शाहरूख खानचा आगामी चित्रपट 'झिरो'चा ट्रेलर प्रदर्शित
बॉलिवूडचा किंग खान शाहरूख आज ५३ वा वाढदिवस साजरा करतो आहे. त्याच्या या स्पेशल दिवशी त्याचा बहुचर्चित आगामी सिनेमा 'झिरो'चा ट्रेलर वडाळा येथील आयमॅक्स थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरला अल्पावधीत खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अडीच लाखांहून अधिक लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे. आतापर्यंत कधी न पाहिलेल्या अंदाजात बॉलिवूडचा किंग खान पाहायला मिळतो आहे.
झिरोच्या ट्रेलरमध्येच शाहरुखची एंट्री धुवाँधार आहे. लग्नासाठी शाहरुख मुलगी शोधत असून अनुष्काचा फोटो पाहूनच तिच्याच तो प्रेमात पडतो. पण तिला पाहिल्यानंतर तिला अंपगत्व असल्याचे त्याला कळते. पण नंतर तो देखील त्याच्या प्रेमात पडतो. या दोघांची ही आगळीवेगळी प्रेमकथा या चित्रपटात मांडण्यात आलेली आहे. आजकालच्या पिढीसारखा तो देखील सेल्फीच्या प्रेमात असल्याचे पाहायला मिळत आहे.
शाहरुख खानचा एक वेगळाच अंदाज ट्रेलरमध्ये दिसून येत असून शाहरुखच्या फॅन्ससाठी त्याने खूपच छान वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट दिले आहे. अनुष्का आणि शाहरुखची केमिस्ट्री देखील मस्त जमून आली आहे. या चित्रपटात शाहरुख, कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाकडून अपेक्षा करण्यात काहीच हरकत नाही. कतरिना कैफचा ग्लॅमरस अवतार नक्कीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
झिरो चित्रपटाचा ट्रेलर लाँच केल्यानंतर शाहरूख खानचा बर्थडे कलाकारांच्या टीमसोबत व प्रसारमाध्यमांसोबत साजरा केला.
'झिरो' चित्रपटात शाहरूख खानने बाउआ सिंगची भूमिका साकारली असून तो बुटका दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.c चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर शाहरूखचे चाहते झिरोच्या रिलीजची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.