ये झलक जरा संभलकर देखना...! शाहरुख खानच्या ‘झिरो’चा नवा ट्रेलर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 10:29 AM2018-11-21T10:29:00+5:302018-11-21T10:31:07+5:30

शाहरुख खानच्या ‘झिरो’चा नवा ट्रेलर रिलीज झालाय. या ट्रेलरमध्येही बऊआ सिंहची धम्माल मस्ती तुमचे मन जिंकल्याशिवाय राहणार नाही. ईदच्या मुहूर्तावर शाहरुखने आपल्या चाहत्यांना भेट देत, हा ट्रेलर रिलीज केला.

zero new trailer shah rukh khan shares new promo video of zero | ये झलक जरा संभलकर देखना...! शाहरुख खानच्या ‘झिरो’चा नवा ट्रेलर!!

ये झलक जरा संभलकर देखना...! शाहरुख खानच्या ‘झिरो’चा नवा ट्रेलर!!

googlenewsNext
ठळक मुद्देया वर्षाच्या सुरूवातीला एसआरकेने ‘झिरो’चा फर्स्ट लूक शेअर केला होता. तेव्हापासून ते आत्तापर्यंत हा आगामी चित्रपट चर्चेत आहे. आनंद एल राय दिग्दर्शित ‘झिरो’ या चित्रपटात शाहरुख खान एका बुटक्या व्यक्तिच्या भूमिकेत आहे.

शाहरुख खानच्या ‘झिरो’चा नवा ट्रेलर रिलीज झालाय. या ट्रेलरमध्येही बऊआ सिंहची धम्माल मस्ती तुमचे मन जिंकल्याशिवाय राहणार नाही. ईदच्या मुहूर्तावर शाहरुखने आपल्या चाहत्यांना भेट देत, हा ट्रेलर रिलीज केला.
या वर्षाच्या सुरूवातीला एसआरकेने ‘झिरो’चा फर्स्ट लूक शेअर केला होता. तेव्हापासून ते आत्तापर्यंत हा आगामी चित्रपट चर्चेत आहे. गत जून महिन्यात ईदच्याच मुहूर्तावर शाहरुखने या चित्रपटाचा टीजर जारी केला होता. यानंतर अलीकडे शाहरूखच्या वाढदिवशी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला गेला. आज ईदच्या दिवशी ‘झिरो’चे पहिले गाणे रिलीज होणार, अशी चर्चा होती. त्यामुळे चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. पण ‘झिरो’चे पहिले गाणे २१ नोव्हेंबरला नाही तर २३ नोव्हेंबरला येणार, असे शाहरुखने स्पष्ट केले. यामुळे चाहते निराश होणे साहजिक होते. पण शाहरुखने चाहत्यांना निराश् न करता ‘झिरो’चा एक शानदार व्हिडिओ जारी केला.



विशेष म्हणजे हा व्हिडिओ पाहतांना काळजी घेण्याचा सल्लाही दिला. ‘बऊआ सिंह की ये झलक जरा संभलकर देखना, कहीं देखते देखते प्यार ना हो जाये,’ असे त्याने लिहिले. तेव्हा तुम्हीही पाहा तर आणि बऊआ सिंहच्या किती प्रेमात पडलात, ते जरूर सांगा.

आनंद एल राय दिग्दर्शित ‘झिरो’ या चित्रपटात शाहरुख खान एका बुटक्या व्यक्तिच्या भूमिकेत आहे. शून्यापासून सुरू केलेला त्याचा प्रवास यात दिसणार आहे. शाहरूखसोबत कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यादेखील यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अनुष्का, कॅटरिना व शाहरूख यांच्या प्रेमाचा त्रिकोण यात पाहायला मिळणार आहे. एकं हा चित्रपट नाताळाच्या मुहूर्तावर म्हणजेच २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: zero new trailer shah rukh khan shares new promo video of zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.