'या' भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीने 'हॅरी पॉटर'मध्ये केलंय काम, ओळखलं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 15:25 IST2025-12-10T15:25:02+5:302025-12-10T15:25:36+5:30
'या' भारतीय क्रिकेटपटूची पत्नी आहे अभिनेत्री; 'हॅरी पॉटर'मध्ये केलंय काम, ओळखलं का?

'या' भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीने 'हॅरी पॉटर'मध्ये केलंय काम, ओळखलं का?
सिनेमाच्या दुनियेत काही फ्रँचायझी अशा असतात, ज्या एका पिढीसाठी एक नॉस्टॅल्जिया बनून जातात. 'हॅरी पॉटर' ही त्यापैकीच एक आहे. जे.के. रोलिंग यांनी रचलेली ही जादूची दुनिया आजही लोकांच्या पसंतीस उतरते आणि ही मूव्ही सिरीज आजही जगातल्या सर्वात महागड्या फिल्म सिरीजपैकी एक मानली जाते. 'हॅरी पॉटर'मध्ये काम केलेले कलाकार आजही जगभर प्रचंड लोकप्रिय आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण एका लोकप्रिय भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीने 'हॅरी पॉटर'च्या अनेक भागांमध्ये हॉगवर्ट्सच्या विद्यार्थिनीची भूमिका साकारली आहे.
तर ती आहे युवराज सिंगची पत्नी हेजल कीच. एका मुलाखतीत हेजलने स्वतः याबद्दल खुलासा केलाय. हेजलने 'हॅरी पॉटर' फ्रँचायझीच्या तीन भागांमध्ये काम केले आहे. 'हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स', 'हॅरी पॉटर अँड द प्रिझनर ऑफ अझकाबान' आणि 'हॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर' या चित्रपटांमध्ये हेझल कीचने बालकलाकार म्हणून भूमिका केल्या होत्या.
बॉलिवूडमध्ये एन्ट्री आणि युवराज सिंगसोबत लग्न
युवराज सिंगसोबत लग्न करण्यापूर्वी हेजल कीचने बॉलिवूडमध्येही नशीब आजमावलं होतं. ती अभिनेता सलमान खानच्या 'बॉडीगार्ड' चित्रपटामुळे चर्चेत आली. तसेच, ती रिअॅलिटी शो 'बिग बॉस ७' मध्येही दिसली होती. २०१६ मध्ये तिने क्रिकेटपटू युवराज सिंगशी लग्न केले. अभिनयाच्या दुनियेपासून दूर असलेली हेजल कीच सध्या तिचा पती युवराज सिंग आणि मुलांसोबत कौटुंबिक जीवनाचा आनंद घेत आहे.