Youtube vs TikTok : युट्यूबशी घेतलेला पंगा टिक टॉकला पडला भारी, असा बसला फटका...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 15:03 IST2020-05-18T14:18:45+5:302020-05-18T15:03:31+5:30
आमिरने युट्यूबर्सची खिल्ली उडवणारा व्हिडीओ शेअर केला होता.

Youtube vs TikTok : युट्यूबशी घेतलेला पंगा टिक टॉकला पडला भारी, असा बसला फटका...
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर लॉकडाऊन व कोरोनाशिवाय आणखी एक मुद्दा ट्रेंड होतोय. होय, युट्यूब विरूद्ध टिक टॉक असे ‘महायुद्ध’ सोशल मीडियावर छेडले आहे. या वॉरची सुरुवात आमिर सिद्दीकी या लोकप्रिय टिक टॉकरच्या व्हिडीओने झाली. आमिरने युट्यूबर्सची खिल्ली उडवणारा व्हिडीओ शेअर केला होता. मग काय, दिग्गज युट्यूबर कॅरी मिनाटीने आमिरला त्याच्याच भाषेत उत्तर देत ‘रोस्ट’ केले होते. कॅरीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता.
आता याचा फटका टिक टॉकला बसला आहे. ज्या टिक टॉकला. 4.5 चे रेटिंग होते ते काल पर्यंत 3.9 तर आज चक्क 3.2 वर आला आहे. यावरुन आपल्याला अंदाज येतोच आहे की भारतीय चाहत्यांनी ठरवले तर ते एका दिवसात कोणालाही स्टार करु शकतात आणि एका दिवसात त्या फ्लॉप. या वॉरमध्ये अनके जणांनी आपला सपोर्ट युट्यूबला देत टिक टॉकला अॅपला डिलीट केले होते.
काही दिवसांपूर्वी हिंदुस्तानी भाऊने आपला 15 लाख फॉलोवर्स असलेले टिक टॉक अकाऊंट डिलीट केले आहे. तसेच त्याने अकाऊंट डिलीट केल्याचा व्हिडीओ शेअर करत आपल्या फॅन्सना देखील टिक टॉक डिलीट करण्याचे आवाहन केले होते. एकूणच असे दिसते आहे की युट्यूबशी घेतलेला पंगा टिक टॉकच्या चांगलाच अंगाशी आला आहे.