​वरूणची शाहरूखला ‘ना’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 18:09 IST2016-05-08T12:39:31+5:302016-05-08T18:09:31+5:30

किंगखान शाहरूख खान ‘इत्तेफाक’ या सुपरडुपर हिट चित्रपटाचा रिमेक घेऊन येतोयं. या चित्रपटासाठी वरूण धवन याला शाहरूखची पहिली पसंती ...

Youthful Shahrukhala 'Na'! | ​वरूणची शाहरूखला ‘ना’!

​वरूणची शाहरूखला ‘ना’!

ंगखान शाहरूख खान ‘इत्तेफाक’ या सुपरडुपर हिट चित्रपटाचा रिमेक घेऊन येतोयं. या चित्रपटासाठी वरूण धवन याला शाहरूखची पहिली पसंती होती. त्यानुसार एसआरकेने वरूणला आॅफर दिली. पण वरूणने म्हणे, ही आॅफर धुडकावून लावली. याचे कारण काय? तर वरूण जवळ म्हणे, अजिबात वेळ नाहीयं. अलीकडे वरूणने ‘ढिशूम’ची शूटींग संपवली. यानंतर वरूण करण जोहरच्या ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’च्या शूटींगमध्ये व्यस्त होणार आहे. डेविड धवनचा चित्रपट ‘जुडवा २’ची शूटींगही वरूण लवकरच सुरु करू शकतो. यामुळेच वरूण प्रचंड व्यस्त आहे. साहजिकच शाहरूखच्या चित्रपटासाठी वरूणकडे अजिबात वेळ नाही. वरूणने शाहरूखसोबत ‘दिलवाले’मध्ये काम केले होते. बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट फारशी चमक दाखवू शकला नव्हता. या अनुभवानंतर शाहरूखचा चित्रपट करण्यास वरूण कचरत असल्याची चर्चा आहे. अर्थात यात खरे किती अन् खोटे किती, हे वरूणलाच ठाऊक़..

Web Title: Youthful Shahrukhala 'Na'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.