मी भोगले ते तुमची मुलंही भोगतील...! तनुश्री दत्ताने दिला शाप!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 13:02 IST2019-01-25T12:53:20+5:302019-01-25T13:02:43+5:30
तनुश्रीने नव्याने नाना पाटकेकर, राकेश सारंग, सामी सिद्दीकी आणि गणेश आचार्य यांच्यावर असली नसली सगळी भडास काढली. केवळ इतकेच नाही तर माझा शाप तुम्हाला भोवणार, कुठलाच देव तुम्हाला वाचवायला येणार नाही, असेही ती म्हणाली.

मी भोगले ते तुमची मुलंही भोगतील...! तनुश्री दत्ताने दिला शाप!!
अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा उखडली आणि या भरात तिने एक ताजे स्टेटमेंट जरारी केले. आपल्या या स्टेटमेंटमध्ये तनुश्रीने नव्याने नाना पाटकेकर, राकेश सारंग, सामी सिद्दीकी आणि गणेश आचार्य यांच्यावर असली नसली सगळी भडास काढली. केवळ इतकेच नाही तर माझा शाप तुम्हाला भोवणार, कुठलाच देव तुम्हाला वाचवायला येणार नाही, असेही ती म्हणाली.
आपल्या स्टेटमेंटमध्ये ती म्हणते, ‘हॉर्न ओके प्लीजच्या गाण्यासाठी मीच गणेश आचार्यच्या नावाची शिफारस केली होती. पण वेळ आली तेव्हा त्यानेही माझी मदत केली नाही. माझ्या एफआयआरमध्ये त्याचेही नाव आहे. केवळ एका व्यक्तिने नाही तर सेटवर हजर असलेल्या चार लोकांनी माझे शोषण केले. मी केवळ २४ वर्षांची होते व बॉलिवूडमध्ये करिअर बनवू इच्छित होते. गणेश आचार्यने या घटनेनंतर मीडियात माझ्याबद्दल भ्रामक गोष्टी पसरवल्या आणि माझे करिअर संपवले. राखी सावंत माझ्याबद्दल अपमानास्पद बोलली. यामागेही गणेश आचार्य याचाच मेंदू होता.
१० वर्षांपूर्वी आणि अलीकडे सहा महिन्यांपूर्वी भारतात असताना इतका अपमान सहन करूनही मी जिवंत कशी, याचेच आश्चर्य वाटते. मी माझ्या मनातून, आत्म्यातून राखी, गणेश आचार्य, नाना, राकेश सारंग आणि निर्माता सामी सिद्दीकीला शाप देते. तुमच्या जवळच्या सर्वांना हा शाप भोगावा लागेल. तुमची मुले, त्यांची मुले सगळयांच तोच मानसिक आणि भावनिक त्रास सहन करावा लागेल, जो मी व माझ्या कुटुंबाने सहन केला. माझे शब्द लक्षात ठेवा. तुमचे मुले-मुली माझ्यासारखेच अश्रू गाळतील. माझा अपमान करणाºया प्रत्येकाला हा शाप भोवणार. कुठलाही पंडित, पुजारी तुम्हाला या शापातून मुक्त करू शकणार नाही. कुठलाही देव तुमच्या मदतीला येणार नाही. योग्य वेळ आली की, देवही तुम्हाला तुमच्या दृष्कृत्याची शिक्षा देईल.’