तनिष्ठाला म्हटले, ‘काली कलुटी’; सोडला शो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 11:29 IST2016-09-28T05:59:39+5:302016-09-28T11:29:39+5:30
उण्यापु-या २२ व्या वर्षी तनिष्ठा चॅटजी जर्मन(2004) सिनेमात झळकली. लवकरच तनिष्ठाचा ‘पार्च्ड’ हा सिनेमा येतोय. लीना यादव दिग्दर्शित या ...

तनिष्ठाला म्हटले, ‘काली कलुटी’; सोडला शो!
उ ्यापु-या २२ व्या वर्षी तनिष्ठा चॅटजी जर्मन(2004) सिनेमात झळकली. लवकरच तनिष्ठाचा ‘पार्च्ड’ हा सिनेमा येतोय. लीना यादव दिग्दर्शित या सिनेमात तनिष्ठाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तनिष्ठा अलीकडे ‘कॉमेडी नाईट्स बचाओ’च्या सेटवर पोहोचली. पण आली नि प्रमोशन न करताच परतली. कॉमेडी नाईट्स बचाओ’ तनिष्ठाच्या सावळ्या रंगावरून जोक्स झालेत. तनिष्ठाला ‘काली कलूटी’ म्हटल्या गेले. ‘तनिष्ठा लहानपणी जांभळं जास्त खायची म्हणून तिचे तोंड काळे आहे,’असे कमेंट तिच्यावर केले गेलेत. यामुळे तनिष्ठा जाम खवळली. आधीचे सगळे विनोद तिने खिळाडूवृत्तीने घेतले. पण रंगरूपावरचे विनोद ऐकून मात्र तनिष्ठाचा पारा चढला आणि तिने शोमधून ताबडतोब बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आश्चर्य म्हणजे, तनिष्ठा जायला निघाली, तरी ‘कॉमेडी नाईट्स बचाओ’च्या टीमला ती का रागावली, हेच कळेना. अखेर तनिष्ठाला काहीतरी खटकल्याचे त्यांच्या लक्षात आले. तुम्हाला काही खटकले असेल तर आम्ही एडिट करू, अशी गळ त्यांनी तनिष्ठाला घातली. पण कदाचित तनिष्ठा मनातून जरा जास्तच दुखावली होती. तिने त्यांची ती विनंती साफ धुडकावून लावत,‘कॉमेडी नाईट्स बचाओ’चा सेट सोडला. याबद्दल तनिष्ठाला विचारले तेव्हा तिने हा संताप बोलून दाखवला. ‘कॉमेडी नाईट्स बचाओ’मध्ये पर्सनल जोक्स होतात. हे मला मान्य आहे. पण माझ्यावरचे जोक्स मला दुखावणारे होते. याठिकाणी माझ्या कामाचे काहीतरी कौतुक होईल, ही अपेक्षा होती. पण त्यापेक्षा ‘कॉमेडी नाईट्स बचाओ’च्या स्क्रिप्टमध्ये माझ्या रंगावर कमेंट्स करण्यात आले. लोकांवरचा ‘व्हाईट हँगओवर’ उतरलेला नाहीच, हेच यावरून दिसते. काळ्या रंगावरून माझ्यावर झालेले जोक्स म्हणजे अतिरेक होता. म्हणून ती ताबडतोब शो सोडण्याचा निर्णय घेतला, असे तनिष्ठा म्हणाली.