कॅटला हवेत ‘यंग हिरो’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2016 22:02 IST2016-08-29T14:38:58+5:302016-08-29T22:02:55+5:30
कॅटरिना कैफची जोडी आधी वर्षांतून एक दोनदा एखाद्या खान, कुमार वा कपूरसोबत दिसायची. पण कदाचित आता तो भूतकाळ झाला. ...

कॅटला हवेत ‘यंग हिरो’!
क टरिना कैफची जोडी आधी वर्षांतून एक दोनदा एखाद्या खान, कुमार वा कपूरसोबत दिसायची. पण कदाचित आता तो भूतकाळ झाला. कारण आता कॅटला रोमान्स करण्यासाठी हवे आहेत केवळ यंग हिरो. अलीकडे कॅटरिनाने केवळ स्वत:चा मेकओवरच केला नाही तर स्वत:च्या करिअरला नवे वळण देण्याचेही तिचे प्रयत्न आहेत. ‘फितूर’ नंतर कॅटच्या करिअरने नवे वळण घेतले असल्याचेही दिसते आहे. आधी आदित्य रॉय कपूर आणि आता सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘बार बार देखो’मध्ये कॅट दिसणार आहे. कदाचित स्वत:पेक्षा वयाने लहान असलेल्या हिरोंसोबत आॅन स्क्रीन रोमान्स करताना कॅटला कम्फर्टेबल वाटू लागले आहे. ‘बार बार देखो’मधील कॅटरिनाचा लूक एकदम फ्रेश आहे. हा फ्रेश लूक मिळवण्यासाठी कॅटला बरीच मेहनत घ्यावी लागली असणार, हे स्पष्ट आहे. एकंदर काय तर केवळ खान, कपूर, कुमार यांच्यांसोबतच नाही तर यंग जनरेशनसोबतही काम करण्यास कॅटला काहीही हरकत नाहीयं, हेच यातून दिसतयं...
![]()
![]()