अमिषा पटेलकडे असलेल्या ‘या’ बॅगची किंमत वाचून तुम्हाला धक्का बसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 16:28 IST2017-09-27T10:52:32+5:302017-09-27T16:28:13+5:30

नुकतीच अभिनेत्री अमिषा पटेल मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. व्हाइट अपर, लोअर आणि शूजमध्ये या अवतारात अमिषा खूपच सुंदर दिसत ...

You will be shocked to read the price of this 'bag' with Ameesha Patel! | अमिषा पटेलकडे असलेल्या ‘या’ बॅगची किंमत वाचून तुम्हाला धक्का बसेल!

अमिषा पटेलकडे असलेल्या ‘या’ बॅगची किंमत वाचून तुम्हाला धक्का बसेल!

कतीच अभिनेत्री अमिषा पटेल मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. व्हाइट अपर, लोअर आणि शूजमध्ये या अवतारात अमिषा खूपच सुंदर दिसत होती. तिने काळ्या रंगाचे सनग्लासेस आणि 'Versace Chaos' काउचरची बॅग कॅरी केली होती. मात्र अमिषाच्या या लूकपेक्षा तिच्या बॅगचीच सध्या अधिक चर्चा रंगत आहे. होय, अमिषाच्या या बॅगची किंमत ऐकाल तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारण या बॅगची किंमत अ‍ॅप्पल कंपनीच्या McBook लॅपटॉपपेक्षाही जास्त आहे. या लॅपटॉपची किंमत ७७५ डॉलर (५०७१३ रुपये) इतकी आहे. तर अमिषाकडे असलेल्या या बॅगची किंमत ७७५ डॉलरपेक्षाही अधिक आहे. अमिषा अखेरीस २०१३ मध्ये आलेल्या ‘शॉर्टकट रोमिओ’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती. 

अमिषाने २००० मध्ये आलेल्या राकेश रोशन दिग्दर्शित ‘कहो ना प्यार हैं’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. फारच कमी लोकांना माहिती आहे की, सुरुवातीला अमिषाने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. कारण तिला तिचे शिक्षण पूर्ण करायचे होते. पुढे याच चित्रपटाने तिला रातोरात सुपरस्टार केले. त्यानंतर २००१ मध्ये आलेल्या ‘गदर : एक प्रेमकथा’ या चित्रपटात अमिषा सनी देओलसोबत झळकली. बॉक्स आॅफिसवर चित्रपटाने धूम उडवून दिल्याने अमिषाच्या करिअरला जणूकाही झळाळी मिळाली होती. 



या चित्रपटासाठी अमिषाला फिल्मफेअर स्पेशल अवॉर्डनेही सन्मानित केले होते. यानंतर अमिषाने ‘जलवा, परवाना, ऐलान, जमीर, वादा, मंगल पांडे’ आदी चित्रपटांमध्ये काम केले. त्याव्यतिरिक्त अमिषाने तामीळ, तेलगू चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली. अमिषा एक भरतनाट्यम ट्रेंड डान्सर आहे. तिला बºयाचशा यशस्वी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतरही तिला हवे तसे करिअर करता आले नाही. अमिषा तिच्या चित्रपट करिअरबरोबरच अफेअरमुळेही चांगलीच चर्चेत राहिली आहे. 

अमिषाचे निर्माता विक्रम भट्ट यांच्याशी अफेअर असल्याची चर्चा होती. दोघांची भेट २००२ मध्ये ‘आप मुझे अच्छे लगने लगे’ या चित्रपटादरम्यान झाली होती. चित्रपट रिलीज झाल्यानंतर दोघांच्या अफेअरच्या बातम्या समोर आल्या होत्या. पुढे तर अशाही बातम्या आल्या होत्या की, हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. मात्र पाच वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. 

Web Title: You will be shocked to read the price of this 'bag' with Ameesha Patel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.