‘या’ फोटोमुळे अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल होतेय वाणी कपूर, यूजर्सच्या प्रतिक्रिया वाचून तुम्ही अचंबित व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 13:24 IST2018-03-15T13:11:47+5:302018-03-16T13:24:49+5:30

अभिनेत्री वाणी कपूर तिच्या एका फोटोमधील ड्रेसमुळे अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल होत आहे. यूजर्सनी तिच्या या फोटोला अतिशय विचित्र स्वरूपाच्या कॉमेण्ट दिल्या आहेत.

You will be amazed by the reaction of 'Vani Kapoor', the user's response that 'this photo is trolled very badly! | ‘या’ फोटोमुळे अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल होतेय वाणी कपूर, यूजर्सच्या प्रतिक्रिया वाचून तुम्ही अचंबित व्हाल!

‘या’ फोटोमुळे अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल होतेय वाणी कपूर, यूजर्सच्या प्रतिक्रिया वाचून तुम्ही अचंबित व्हाल!

ेफिक्रे’ आणि ‘शुद्ध देसी रोमांस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणारी अभिनेत्री वाणी कपूर हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अतिशय डिफरेंट आउटफिटमध्ये तिचा एक फोटो शेअर केला. मात्र काही चाहत्यांना तिचा हा मॉडर्न आउटफिट अजिबातच पसंत आला नसल्याने त्यांनी तिला अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने तिच्या आउटफिटची खिल्ली उडविताना लिहिले की, ‘बेडशिट चांगले दिसत आहे. आणखी एका यूजरने लिहिले की, ‘हा ड्रेस आहे की, चादर गुंडाळून घेतली?’ फेसबुकिया नावाच्या एका अकाउंट यूजरने लिहिले की, ‘जेव्हा तुमच्याकडे कपडे खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसतात तेव्हा तुम्ही पडद्यांना फॅशन म्हणून वापरण्यास सुरुवात करता. मीदेखील या परिस्थितीतून गेलो आहे, त्यामुळे मी तुझे दु:ख समजू शकतो.’

वाणीच्या या फोटोला अशाप्रकारच्या बºयाचशा कॉमेण्ट्स आल्या. एका यूजरने लिहिले की, ‘किती चांगल्या पद्धतीने यास तयार केले आहे. एका यूजरने वाणीला विचारले की, ‘हे तेच बेडशिट आहे ना जे तू बेफिक्रे या चित्रपटात गुंडाळले होते?’ ऋषभ नावाच्या एका यूजरने लिहिले की, एवढ्या गर्मीच्या मौसमात ब्लॅकेंट का परिधान केले?’ अशा विविध स्वरूपाच्या प्रतिक्रिया वाणीच्या या फोटोला दिल्या जात आहेत. वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास, अखेरीस ती १९७३ मध्ये आलेल्या ‘दाग’ या चित्रपटातील ‘नी मैं यार मानाना नी’ या गाण्याच्या रिमेकमध्ये बघावयास मिळाली होती. 
 

वाणीने तिच्या करिअरची सुरुवात ‘शुद्ध देसी रोमांस’ या चित्रपटातून केली. चित्रपटात तिने तारा नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. अखेरीस ती ‘बेफिक्रे’ या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगसोबत बघावयास मिळाली होती. चित्रपटात तिने अतिशय बिनधास्त मुलीची भूमिका साकारली होती. तिच्या या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली होती. २०१६ मध्ये वाणी कपूरकडे एकही चित्रपट नव्हता. आता तिचे करिअर काहीसे ट्रॅकवर येताना बघावयास मिळत आहे. 

Web Title: You will be amazed by the reaction of 'Vani Kapoor', the user's response that 'this photo is trolled very badly!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.