तुमच्याकडे आहे ‘जुडवा2’चे ट्रेलर लॉन्च करण्याची संधी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2017 14:21 IST2017-07-02T08:51:28+5:302017-07-02T14:21:28+5:30
वरूण धवन, जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू या तिघांनीही सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत काय खास आहे ? तर ट्रेलर लॉन्च करण्याची संधी. होय, वरूण, जॅक व तापसी या तिघांनाही तुमच्या हाताने ट्रेलर लॉन्च करायचे आहे. अर्थात यासाठी एक अट आहे.

तुमच्याकडे आहे ‘जुडवा2’चे ट्रेलर लॉन्च करण्याची संधी!
व ूण धवन नव्या जनरेशनचा एकुलता एक असा स्टार आहे, त्याचे सर्व चित्रपट बॉक्सआॅफिसवर हिट झालेत. आता वरूण धवन आपल्या चाहत्यांसाठी ‘जुडवा2’ हा सिनेमा घेऊन येतो आहे. यात त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू या मुख्य भूमिकेत आहे. चित्रपट रिलीज व्हायला आणखी तीन महिन्यांचा अवकाश आहे. पण या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्चिंगची तयारी मात्र जोरात सुरु आहे. सोबत प्रमोशनही. वरूण, जॅक व तापसी तिघांनीही चित्रपटाचे जोरदार प्रमोशन चालवले आहे. अलीकडे या तिघांनीही सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत काय खास आहे ? तर ट्रेलर लॉन्च करण्याची संधी. होय, वरूण, जॅक व तापसी या तिघांनाही तुमच्या हाताने ट्रेलर लॉन्च करायचे आहे. अर्थात यासाठी एक अट आहे.
‘जुडवा2’मध्ये वरूण धवन डबलरोलमध्ये दिसणार, हे तर तुम्हाला ठाऊक आहेच. त्यामुळे जे रिअल लाईफमध्ये जुळी आहेत, अशांच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्याची वरूण तसेच जॅक व तापसीची इच्छा आहे. तुम्ही तुमच्या रिअल लाईफमध्ये जुळी असाल तर तुम्हाला ‘जुडवा2’चा ट्रेलर लॉन्च करण्याची संधी मिळू शकते. यासाठी आपल्याला केवळ एक स्वत:चा एक व्हिडिओ आणि मॅसेज टिष्ट्वटर, फेसबुक व इन्स्टाग्रामवर पाठवायचा आहे. यापैकी निवड केली जाईल आणि काही खास जुळ्यांना ‘जुडवा2’चा ट्रेलर लॉन्च करण्याची संधी मिळेल.
‘जुडवा2’चा हा चित्रपट ९० च्या दशकात आलेल्या ‘जुडवा’चा सीक्वल आहे. ‘जुडवा’मध्ये सलमान खान, रंभा व करिश्मा कपूर अशी स्टारकास्ट होती. ‘जुडवा2’मध्येही सलमान व करिश्माचा एक स्पेशल कॅमिओ असणार आहे.