शाहरूख खानच्या या तीन सवयी तुम्हाला माहीत नाहीत; मात्र अनुष्का शर्माला चांगल्या माहिती आहेत!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2017 20:17 IST2017-07-08T14:07:43+5:302017-07-08T20:17:23+5:30

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख याच्याविषयी त्याच्या चाहत्याला माहिती नसेल असे म्हणणे जरा घाईचेच ठरेल. परंतु अशातही शाहरूखच्या तीन सवयी ...

You do not know these three habits of Shah Rukh Khan; But Anushka Sharma is good enough !! | शाहरूख खानच्या या तीन सवयी तुम्हाला माहीत नाहीत; मात्र अनुष्का शर्माला चांगल्या माहिती आहेत!!

शाहरूख खानच्या या तीन सवयी तुम्हाला माहीत नाहीत; मात्र अनुष्का शर्माला चांगल्या माहिती आहेत!!

लिवूडचा किंग खान शाहरूख याच्याविषयी त्याच्या चाहत्याला माहिती नसेल असे म्हणणे जरा घाईचेच ठरेल. परंतु अशातही शाहरूखच्या तीन सवयी अशा आहेत, ज्या तुम्हाला माहिती नाहीत. केवळ अनुष्का शर्माच याविषयी जाणून आहे. सध्या शाहरूख आणि अनुष्का त्यांच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, माध्यमांमध्ये ते चित्रपटांबरोबर खासगी आयुष्याविषयीदेखील बरेचसे खुलासे करीत आहेत. बॉलिवूड लाइफ या वेबसाइटला मुलाखत देतानादेखील त्यांनी अशाचप्रकारचे काही धक्कादायक खुलासे केले. 

यावेळी अनुष्काने शाहरूखविषयी तीन सवयी सांगितल्या ज्या कदाचित तुम्हाला माहीत नसतील. त्या सवयी कोणत्या हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली माहिती वाचावी लागेल. 

१ : शाहरूख खान कधीच थर्मल (इनर) घालत नाही. मग कितीही थंडी पडो पण तो कधीच इनर घालत नाही. ‘जब तक है जान’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनुष्काला थंडी वाजत होती. त्यावेळी अनुष्काने लगेचच थर्मल घातले. परंतु शाहरूखने घातले नाही. अनुष्काने म्हटले की, शाहरूख थंडी सहन करू शकतो, परंतु थर्मल घालू शकत नाही. 

२ : शाहरूखला जेव्हा भूख लागते, तेव्हा तो काहीही खाऊ शकतो. अशावेळी तो कुठल्याच डिमांडच्या भानगडीत पडत नाही. टेबलवर जे काही ठेवलेले असते, त्यावर तो तुटून पडतो. मग त्याला वडापाव दिला तरी चालेल. 

३ : शाहरूखची आणखी एक सवय म्हणजे तो नेहमीच काही अत्यावश्यक वस्तू सोबत ठेवतो. ज्याचा वापर तो कधीही करू शकतो. अनुष्काने म्हटले की, एकदा मी शाहरूखला ‘माझे वजन वाढले’ असे म्हटले होते. त्यावर त्याने लगचेच त्याच्या एका खास व्यक्तीला बोलावून घेतले. त्याचे नाव ‘बंगाली’ होते. बंगालीने काही वेळानंतर शाहरूखला एक बॅग आणून दिली. त्यामधून वजन मोजण्याची एक मशीन काढली. हे बघून मी दंग राहिले. यावेळी शाहरूखने म्हटले होते की, मी माझ्या अत्यावश्यक वस्तू २०१० पासूनच सोबत ठेवत आहे. 



अनुष्का शर्मा आणि शाहरूख खान यांनी आतापर्यंत तीन चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामध्ये ‘रबने बना दी जोडी’, ‘जब तक हैं जान’, ‘ए दिल हैं मुश्किल’ या चित्रपटांचा समावेश आहे. या सर्वच चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर धूम उडवून दिल्याने बॉलिवूडमधील ही एक सक्सेसफुल जोडी आहे. इम्तियाज अली यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट ४ आॅगस्ट रोजी रिलीज होणार आहे. आतापर्यंत या चित्रपटाचे पाच मिनी ट्रेलर रिलीज करण्यात आले आहे. 

Web Title: You do not know these three habits of Shah Rukh Khan; But Anushka Sharma is good enough !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.