सनी लिओनीबरोबर तुम्हालाही दररोज करता येईल वर्कआउट, वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 17:23 IST2017-10-24T11:53:43+5:302017-10-24T17:23:43+5:30

अभिनेत्री आणि बॉलिवूडची आयटम गर्ल सनी लिओनी हिची प्रत्येक अदा अनोखी आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. काही ...

You can also work with Sunny Leone everyday, read detailed! | सनी लिओनीबरोबर तुम्हालाही दररोज करता येईल वर्कआउट, वाचा सविस्तर!

सनी लिओनीबरोबर तुम्हालाही दररोज करता येईल वर्कआउट, वाचा सविस्तर!

िनेत्री आणि बॉलिवूडची आयटम गर्ल सनी लिओनी हिची प्रत्येक अदा अनोखी आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. काही दिवसांपूर्वीच तिने नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कंडोमची जाहिरात करून धूम उडवून दिली होती. वास्तविक तिची ही जाहिरात प्रचंड वादग्रस्त ठरली. आता पुन्हा एकदा ती छोट्या पडद्यावर मोठा धमाका करणार आहे. होय, ‘स्प्लिट्सव्हिला’मध्ये बघावयास मिळाल्यानंतर सनी लिओनी आता दररोज सकाळी प्रेक्षकांना फिट राहण्याचे फंडे सांगताना दिसणार आहे. ती एमटीव्ही बीट्स चॅनेलवरील ‘फिटस्टॉप’ हा शो होस्ट करणार आहे. एका तासाच्या या शोमध्ये सनी लिओनी प्रेक्षकांना फिट आणि हेल्दी राहण्याचा सल्ला देणार आहे. त्यासाठी ती ब्लॉकबस्टर प्लेलिस्टसोबत कसरतही करीत आहे. हा बहुधा पहिलाच शो असेल ज्यामध्ये म्युझिकबरोबरच एक्सरसाइजचे धडे दिले जाणार आहेत. 

याविषयी सनी लिओनीने सांगितले की, ‘मी फिट राहण्यासाठी वर्कआउट करण्यावर विश्वास ठेवते. कारण वर्कआउट केल्याने तुम्ही फिजिकली आणि मेंटली फिट राहता. खरं प्रत्येकानेच दैनंदिन जीवनात क्विक एक्झरसाइज करायला वेळ काढायला हवा. मी एमटीव्ही बीट्सवर ‘फिटस्टॉप’ शो घेऊन येणार आहे. मी केवळ प्रेक्षकांनाच कसरत करायला लावणार नसून, त्यांच्याकरिता चांगले म्युझिकही घेऊन येणार आहे. ज्यामुळे त्यांना घाम घाळण्यास मदतच  होईल. हा शो दररोज सकाळी प्रसिद्ध केला जाईल, ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण दिवस  मोटिव्हेट केल्याचे वाटेल. 



नवरात्रोत्सवादरम्यान, सनी लिओनीने कंडोमची जाहिरात करून वाद निर्माण केला होता. गुजरात, अहमदाबाद, सुरत या शहरांमध्ये तिच्या जाहिरातीवरून चांगलेच वादंग निर्माण झाले होते. गोव्यामध्येही तिची ही जाहिरात चांगलीच वादग्रस्त ठरली. आता सनी पुन्हा एकदा या नव्या शोमधून धूम उडवून देण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे तुम्हाला जर सनी लिओनीबरोबर एक्झरसाइज करायची असेल तर तुम्ही हा शो बघायला हरकत नाही. 

Web Title: You can also work with Sunny Leone everyday, read detailed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.