‘सर्कस’च्या निमित्ताने जुळून येणार योग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 13:00 IST2016-09-28T07:30:19+5:302016-09-28T13:00:19+5:30
कोरिओग्राफर बास्को मार्टिस ‘सर्कस’ नावाचा सिनेमा घेऊन येणार आहे. परिणीती चोप्राने या चित्रपटातून अंग काढून घेतले. आता परिणीतीच्या जागी ...

‘सर्कस’च्या निमित्ताने जुळून येणार योग!
क रिओग्राफर बास्को मार्टिस ‘सर्कस’ नावाचा सिनेमा घेऊन येणार आहे. परिणीती चोप्राने या चित्रपटातून अंग काढून घेतले. आता परिणीतीच्या जागी या चित्रपटात अथिया शेट्टी हिची वर्णी लागणार असल्याची खबर आहे. अथियासोबत सूरज पांचोली हाही दिसणार असल्याची चर्चा आहे. म्हणजेच ‘सर्कस’साठी अथिया व सूरज पुन्हा एकदा एकत्र दिसण्याची शक्यता आहे. ‘सर्कस’ हा सिनेमा एका बाप-लेकीची कथा आहे. विशेष म्हणजे,यात अथियासोबत तिचे पप्पा सुनील शेट्टी सुद्धा ‘सर्कस’मध्ये दिसणार आहेत. एकंदर काय तर चर्चा मार्गी लागलीच तर रिअल लाईफ बाप-लेक आणि रिल लाईफ कपल असा योग ‘सर्कस’च्या निमित्ताने जुळून येणार आहे. तेव्हा लेट्स सी!