YO YO!! आपल्या ‘ म्युझिक बॉम्ब’सह हनी सिंह करणार धमाकेदार वापसी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 14:17 IST2017-12-13T08:45:38+5:302017-12-13T14:17:27+5:30

 ‘हाय हिल्स’, ‘लुंगी डान्स’,‘देसी कलाकार’,‘अंग्रेजी बीट’ असे पार्टी साँग गाऊन चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला रॅपर हनी सिंह दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून ...

YO YO !! Honey lions with their 'music bombs' come back with a bang! | YO YO!! आपल्या ‘ म्युझिक बॉम्ब’सह हनी सिंह करणार धमाकेदार वापसी !

YO YO!! आपल्या ‘ म्युझिक बॉम्ब’सह हनी सिंह करणार धमाकेदार वापसी !

 
हाय हिल्स’, ‘लुंगी डान्स’,‘देसी कलाकार’,‘अंग्रेजी बीट’ असे पार्टी साँग गाऊन चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला रॅपर हनी सिंह दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. निश्चितपणे त्याच्या अशा गायब असण्याने चाहते हिरमुसले आहेत. पण आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, तुमचा आमचा लाडका हनी लवकरच नव्या गाण्यासह जोरदार वापसी करणार आहे. हे नवे गाणे कुठल्या अणूबॉम्बपेक्षा कमी नाही, असे हनीने म्हटले आहे. खुद्द हनीने आपल्या फेसबुक पेजवर याची घोषणा केली. या गाण्यानंतर मला पुन्हा चाहत्यांचे तेच प्रेम आणि लोकप्रीयता मिळेल, असा दावा त्याने केला आहे. या पोस्टमध्ये हनी सिंहने त्याचा जवळचा मित्र जेजी बी याचा एक म्युझिक व्हिडिओ शेअर केला आहे.
एक काळ असा होता, जेव्हा सर्वांच्याच ओठांवर यो योची गाणी होती. पण यशाच्या शिखरावर असतानाच यो यो अचानक गायब झाला. यादरम्यान त्याच्याबद्दल नाही नाही त्या अफवांचे पीक आले होते. पण यानंतर एका मुलाखतीत याकाळात त्याच्यासोबत काय काय घडले, हे हनीने जगासोबत शेअर केले होते.  बॉलिवूडमधून काही काळ  मी  गायब होतो. बायपोलर डिसआॅर्डरशी माझी झुंज सुरु होती.  यादरम्यान मी चार डॉक्टर बदलले. औषधांचा माझ्यावर कुठलाही परिणाम होत नव्हता. मी अक्षरश: वेडा झालो होतो. ते १८ महिने माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण दिवस होते. मी रिहॅब सेंटरमध्ये असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पण मी नोएडातील माझ्या घरी होतो, असे हनीने या मुलाखतीत कबुल केले होते.  बायपोलर डिआॅर्डरमध्ये रूग्णाचे मूड क्षणाक्षणाला बदलते. कधी पराकोटीचा आनंद तर कधी घोर निराशा, असे त्याचे मूड असते. याच आजारामुळे हनीसिंह मद्याच्या आहारी गेला. इतका की, त्याला हे व्यसन सोडवण्यासाठीही उपचार घ्यावे लागले होते. 

ALSO READ : ​बायोपिकसाठी यो यो हनी सिंगला मिळाली इतक्या कोटींची आॅफर!

Web Title: YO YO !! Honey lions with their 'music bombs' come back with a bang!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.