मुमताज यांनी मागितली ‘इतकी’ रक्कम, ऐकून ‘डान्स दिवाने 3’च्या मेकर्सचेही डोळे झाले पांढरे!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 04:05 PM2021-09-30T16:05:15+5:302021-09-30T16:06:56+5:30

Actress Mumtaz in Dance Deewane 3 :  मुमताज ‘डान्स दिवाने 3’मध्ये येणार हे ऐकून शोची अख्खी टीम आनंदात होती. पण आता....

Yesteryear Actress Mumtaz To Not Grace Dance Deewane 3 Makers Refuse To Pay The Money Fomer Demanded | मुमताज यांनी मागितली ‘इतकी’ रक्कम, ऐकून ‘डान्स दिवाने 3’च्या मेकर्सचेही डोळे झाले पांढरे!!

मुमताज यांनी मागितली ‘इतकी’ रक्कम, ऐकून ‘डान्स दिवाने 3’च्या मेकर्सचेही डोळे झाले पांढरे!!

googlenewsNext
ठळक मुद्दे1990 साली मुमताज यांनी बॉलिवूडला रामराम ठोकला. तेव्हापासून त्या स्क्रिनवर झळकलेल्या नाहीत.

रिअ‍ॅलिटी शोमध्ये गतकाळातील लोकप्रिय कलाकारांना स्पेशल गेस्ट म्हणून बोलवणं आत्ताचा जणू ट्रेंड झाला आहे. या कलाकारांच्या तोंडून त्यांच्या करिअरमधील वेगेवेगळे किस्से ऐकणं, सहकलाकारांसोबतच्या गमतीजमती ऐकणं, अनुभव ऐकणं हे प्रेक्षकांनाही आवडतं. यामुळं एपिसोडला प्रेक्षक मिळतो, चॅनलचा टीआरपी वाढतो आणि चर्चा होते ती वेगळीच. साहजिकच जुन्या स्टार्सला शोमध्ये बोलवण्याची चढाओढ दिसून येते. अलीकडे  ‘डान्स दिवाने 3’  (Dance Deewane Season 3) या डान्सिंग रिअ‍ॅलिटी शोबद्दल अशीच एक बातमी समोर आली. या शोच्या एका खास एपिसोडमध्ये गतकाळातील लोकप्रिय अभिनेत्री मुमताज (Mumtaz)  येणार, अशी ही बातमी कानावर आली.  

मुमताज ‘डान्स दिवाने 3’मध्ये येणार हे ऐकून शोची अख्खी टीम आनंदात होती. पण आता या आनंदावर विरजण पडलं आहे. होय, मुमताज यांनी शोमध्ये येण्यासाठी इतकी मोठी रक्कम ऐकली की, तो आकडा पाहून ‘डान्स दिवाने 3’च्या मेकर्सचेही डोळे पांढरे झालेत.

होय, चर्चा खरी मानाल तर ‘डान्स दिवाने 3’च्या मेकर्सनी मुमताज यांना शोसाठी अ‍ॅप्रोच केलं होतं.   मुमताज यायला तयार होत्या. अर्थात स्वत:च्या अटीवर. शोमध्ये येण्यासाठी त्यानी 40-50 लाख रूपयांची मागणी केली. ही रक्कम ऐकून मेकर्सचे डोळे फिरले. मुमताज एकेकाळच्या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. त्या शोमध्ये आल्याने चॅनलला फायदाही होणार होता. पण त्यासाठी 40-50 लाख रूपये मोजण्याची मेकर्सची तयारी नव्हती. कारण ही रक्कम खूप मोठी होती. मेकर्सनी मुमताज यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण मुमताज म्हणे, पैशांबाबतीत तडजोड करायला तयार नव्हत्या. अखेर त्यांचा शोमध्ये आणण्याचा बेतचं मेकर्सनी रद्द केला.
1990 साली मुमताज यांनी बॉलिवूडला रामराम ठोकला. तेव्हापासून त्या स्क्रिनवर झळकलेल्या नाहीत. त्या ‘डान्स दिवाने 3’मध्ये आल्या असत्या तर तो त्यांचा रिअ‍ॅलिटी शोमधील पहिला गेस्ट अपीअरन्स ठरला असता.

Web Title: Yesteryear Actress Mumtaz To Not Grace Dance Deewane 3 Makers Refuse To Pay The Money Fomer Demanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.