Photos : ‘ये दिल आशिकाना’ची ‘ही’ हिरोईन आधीपेक्षाही दिसते सुंदर, फोटो पाहून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 17:56 IST2022-08-10T17:54:09+5:302022-08-10T17:56:28+5:30
Yeh Dil Aashiqana : ‘ये दिल आशिकाना’ हा चित्रपट आठवत असेल तर या चित्रपटातील करण नाथची हिरोईन बनलेली जीविधा शर्मा सुद्धा तुम्हाला नक्कीच आठवत असणार...

Photos : ‘ये दिल आशिकाना’ची ‘ही’ हिरोईन आधीपेक्षाही दिसते सुंदर, फोटो पाहून थक्क व्हाल
काही मोजके सिनेमे नावावर असलेल्या अनेक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आहेत. जीविधा शर्मा ( Jividha Sharma) अशीच एक हिरोईन. ‘ये दिल आशिकाना’ (Yeh Dil Aashiqana ) हा चित्रपट आठवत असेल तर या चित्रपटातील करण नाथची हिरोईन बनलेली जीविधा शर्मा सुद्धा तुम्हाला नक्कीच आठवत असणार. ‘ये दिल आशिकाना’ या चित्रपटामधून जीविधाने धमाकेदार डेब्यू केला होता. या चित्रपटानंतर ती एका रात्रीत स्टार झाली होती. चित्रपटातील ‘उठा ले जाऊंगा’ आणि ‘ये दिल आशिकाना’ ही गाणी जितकी गाजली, तितकीच जिविधा सुद्धा गाजली. तिच्या ओठाच्या खाली असलेला तीळ, तिचं सौंदर्य पाहून चाहते तिच्यावर फिदा झालेत. अर्थात ही गोड चेहऱ्याची हिरोईन बॉलिवूडमध्ये फार काळ टिकली नाही.
अमिषा पटेल, ऐश्वर्या राय, प्रीति झिंटा या अभिनेत्रींपुढे तिचा टिकाव लागला नाही. अमिषा पटेल, ऐश्वर्या राय, प्रीति झिंटा त्यावेळी मोठ्या स्टार होत्या आणि अशा काळात नव्या हिरोईनला स्वत:ची जागा निर्माण करणं सोप्प नव्हतं.
‘ये दिल आशिकाना’ हिट झाला पण बॉलिवूडच्या स्पर्धेत जीविधा मागे पडली. तिला बॉलिवूडच्या ऑफर्स मिळेनाशा झाल्यात. बॉलिवूडमध्ये आपल्याला फार काही वाव नाही म्हटल्यावर जीविधाने साऊथकडे आपला मोर्चा वळवला. अर्थात तिथेही तिच्या पदरात निराशाच पडली.
‘ये दिल आशिकाना’ या चित्रपटाआधी जीविधाने ऐश्वर्या रॉय आणि अनिल कपूर यांच्या ‘ताल’ या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात तिने ऐश्वर्या रॉयच्या बहिणीची भूमिका साकारली होती. परंतु ऐश्वर्या रॉय पुढे तिच्याकडे फारसं कुणाचं लक्षच गेलं नाही. त्यानंतर 2009 मध्ये जीविधाने ‘मिनी पंजाब’ या चित्रपटातून पंजाबी चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश केला.
1999 ते 2000 पर्यंत तिने तेलुगू, तमीळ आणि हिंदी चित्रपटात काम केलं. पण तरिही तिला स्वत:ची स्टार म्हणून ओळख निर्माण करता आली नाही. यापश्चात ती अनेक मालिकांमध्ये देखील दिसली. तुम बिन कहा जाऊ, जमी से आसमा तक या मालिकांमध्ये शिवाय सावधान इंडिया, फेअर फाइल्समध्ये तिने छोट्या मोठ्या भूमिका केल्यात.
आता जीविधा बॉलिवूडमध्ये कुठेच नाही. अर्थात सोशल मीडियावर मात्र ती प्रचंड अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावर ती रोज स्वत:चे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.