यंदा दिवाळीत बॉक्सआॅफिसवर रंगणार घमासान! अजय, आमिर, रजनीकांत येणार आमने-सामने!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2017 11:35 IST2017-04-17T06:05:03+5:302017-04-17T11:35:03+5:30
बॉलिवूडमध्ये या दिवाळीत घमासान होणार आहे. होय, बॉक्सआॅफिसवर एक मोठा संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. या दिवाळीत दोन मोठे ...

यंदा दिवाळीत बॉक्सआॅफिसवर रंगणार घमासान! अजय, आमिर, रजनीकांत येणार आमने-सामने!!
ब लिवूडमध्ये या दिवाळीत घमासान होणार आहे. होय, बॉक्सआॅफिसवर एक मोठा संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. या दिवाळीत दोन मोठे सिनेमे रिलीज होणार आहेत, हे तर तुम्हाला ठाऊक आहेच. एक म्हणजे मेगास्टार रजनीकांत व अक्षय कुमारचा 2.0 आणि दुसरा म्हणजे बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान याचा ‘सीक्रेट सुपरस्टार.’ या दोन्ही चित्रपटांचा बॉक्सआॅफिसवरचा संघर्ष अटळ असल्याची बातमी आम्ही तुम्हाला दिली होतीच. पण बातमी इथेच संपत नाही. अजय देवगणचा ‘गोलमाल4’ हा सिनेमाही दिवाळीतच रिलीज होणार आहे. म्हणजे, बॉक्सआॅफिसवर या दिवाळीत एक नाही तर तीन तीन सिनेमे धडकणार आहेत. खुद्द अजय देवगण आणि ‘गोलमाल4’चे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एका मुलाखतीत ‘गोलमाल4’चे निर्माता शिबसिश सरकार यांनीही याचे संकेत दिले आहेत. दिवाळी आंनदाचा सण आहे. या काळात मुलांना सुट्ट्या असतात. त्यामुळे ‘गोलमाल4’ दिवाळीच्या मुहूर्तावरच रिलीज व्हावा, असे आमचे मत आहे. ‘गोलमाल4’ एक कौटुंबिक विनोदी चित्रपट असल्याने लोक तो आनंदाने पाहतील, असेही ते म्हणाले.
ALSO READ : या दिवाळीत रंगणार आमिर खान अन् अक्षय कुमारचा संघर्ष!
एकंदर काय तर आता दिवाळीत घमासान पक्के आहे. एकीकडे रजनीकांत-अक्षय यांचा ‘2.0’, दुसरीकडे आमिरचा ‘सीक्रेट सुपरस्टार’ आणि तिसरीकडे ‘गोलमाल4’ असा मोठा संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. ‘दंगल’च्या यशानंतर आमिरच्या ‘सीक्रेट सुपरस्टार’बद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे. अजयचे चाहतेदेखील ‘शिवाय’नंतर ‘गोलमाल4’ पाहण्यास उत्सूक आहेत. तिकडे रजनीकांत व अक्षय दोघांच्या चाहत्यांचीही उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. अशात कोण तरणार अन् कोण आपटणार, हे तर येणारा काळच सांगेल.