यामी म्हणते, हे खोटे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2016 21:30 IST2016-09-04T16:00:00+5:302016-09-04T21:30:00+5:30
हृतिक रोशनच्या नादुरूस्त तब्येतीमुळे ‘काबील’ हा चित्रपट रखडलाय, हे तुम्ही ऐकले असेलच. पण ‘काबील’मध्ये हृतिकच्या अपोझिट दिसणार असलेल्या यामी ...
.jpg)
यामी म्हणते, हे खोटे!
ह तिक रोशनच्या नादुरूस्त तब्येतीमुळे ‘काबील’ हा चित्रपट रखडलाय, हे तुम्ही ऐकले असेलच. पण ‘काबील’मध्ये हृतिकच्या अपोझिट दिसणार असलेल्या यामी गौतमला याबाबत विचाराल तर यात काहीही तथ्य नसल्याचेच ती सांगेल. हृतिकची प्रकृती सध्या नरम-गरम आहे. त्यामुळे ‘काबील’चे शूटींग रखडलेयं, हे खरे आहे का? असा प्रश्न यामाीला विचारण्यात आला. यामीने मात्र हा प्रश्न अक्षरश: उडवून लावला. यात काहीही सत्य नाहीय. चित्रपटाचे शूटींग जोरात सुरु आहे. एका गाण्याचे शूटींग आम्ही संपलेय, असे ती म्हणाली. हृतिकची स्तुती करायलाही ती विसरली नाही. हृतिकसोबत काम करण्याचा अनुभव अद्भुत आहे. विशेषत: त्याच्यासोबत डान्स करणे. हृतिक अतिशय ऊर्जाशील व्यक्ती आहे. काहीही शिकण्याची त्याची तयारी आहे, असे यामी म्हणाली. संजय गुप्ता दिग्दर्शित ‘काबील’ हा चित्रपट पुढील वर्षी २६ जानेवारीला रिलीज होणार आहे.