'बत्ती गुल मीटर चालू' या चित्रपटाचा हिस्सा बनण्यासाठी यामी गौतमला करावे लागले हे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 13:26 IST2018-02-01T07:56:13+5:302018-02-01T13:26:13+5:30

बॉलिवूड इंडस्ट्रीचे काही अनोखे नियम आहेत. जर तुमचा चित्रपट हिट झाला तर तुमच्या शंभर चुका माफ मात्र जर तुमची ...

Yami Gautam had to do this to become a part of the film 'Batki Gul Meter Current' | 'बत्ती गुल मीटर चालू' या चित्रपटाचा हिस्सा बनण्यासाठी यामी गौतमला करावे लागले हे काम

'बत्ती गुल मीटर चालू' या चित्रपटाचा हिस्सा बनण्यासाठी यामी गौतमला करावे लागले हे काम

लिवूड इंडस्ट्रीचे काही अनोखे नियम आहेत. जर तुमचा चित्रपट हिट झाला तर तुमच्या शंभर चुका माफ मात्र जर तुमची वेळ खराब चालू असेल तर लोक तुमच्या उगाच चुका काढत राहतात. सध्या असेच काहीसे घडतयं  अभिनेत्री यामी गौतमवरसोबत.  डीएनएच्या रिपोर्टनुसार यामी गौतमचे नाव शाहिद कपूरच्या अपोझिट बत्ती गुलसाठी फायनल करण्यात आले आहे. मात्र याचित्रपटासाठी यामीला टी-सिरिजची माफी मागावी लागणार आहे. जर तिने असे केले नाही तर तिच्या हातून हा चित्रपट निघून जाईल.  
त्याचे झाले असे की यामीने टी-सिरिजच्या सनम रे चित्रपटात काम केले होते. त्यादरम्यान टी-सिरिजच्या मालकासोबत तिचे खटके उडाले होते. टी-सिरिजचे मालक भूषण कुमार आणि पत्नी दिव्या खोसला यामीवर नाराज झाले होते. त्यामुळे आता प्रेरणा अरोराला टी-सिरिजने सांगितले आहे की यामीला टी-सिरिजची माफी मागायला सांग. बत्ती गुल हा चित्रपट टी-सिरीज आणि प्रेरणा अरोराची क्रि-अर्ज एंटरटेन्मेंट एकत्र मिळून करतायेत. 

या संपूर्ण प्रकरात यामी गौतम माफी मागायला तयार नाही आहे. ज्यावेळी प्रेरणा अरोराने यासंदर्भात यामीशी संपर्क साधला त्यावेळी यामीने माफी मागण्यास नकार दिला. मी जी चुक केलीच नाहीय त्याबद्दल माफी का मागू असा प्रश्न यामीने केला. 

आता हे बघणं महत्त्वाचे आहे की चित्रपटातील यामीची जागा टिकून राहते की तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येतो. शाहिद कपूर या चित्रपटात वकिलाची भूमिका साकारणार आहे. तसेच चित्रपटात अभिषेक बच्चन यांच्यादेखील या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट वीजेच्या समस्येवर आधारित आहे. 

यामीने २०१२ मध्ये ‘विकी डोनर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. या व्यतिरिक्त तिने ‘अ‍ॅक्शन जॅक्सन, टोटल सफाया, बदलापूर, सनम रे, जुनूनियत, काबिल, सरकार-३’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. मात्र अशातही यामी इंडस्ट्रीत स्ट्रगल करताना दिसत आहे. 

Web Title: Yami Gautam had to do this to become a part of the film 'Batki Gul Meter Current'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.