यामीला ‘सरकार3’ची लॉटरी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2016 19:10 IST2016-09-17T13:40:19+5:302016-09-17T19:10:19+5:30
बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे लवकरच ‘सरकार3’ घेऊन येत आहेत. ‘सरकार३’मध्येही अमिताभ बच्चन हेच मुख्य भूमिकेत असतील. पण ...

यामीला ‘सरकार3’ची लॉटरी?
ब लिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे लवकरच ‘सरकार3’ घेऊन येत आहेत. ‘सरकार३’मध्येही अमिताभ बच्चन हेच मुख्य भूमिकेत असतील. पण कदाचित अभिनेत्री मात्र बदललेली असेल. होय, ‘सरकार’मध्ये कॅटरिना कैफ फिमेल लीडमध्ये दिसली होती. तर ‘सरकार2’मध्ये ऐश्वर्या राय ही लीडिंग लेडी होती. ‘सरकार3’मध्ये अद्याप कुठल्याही अभिनेत्रीची वर्णी लागलेली नाही. मात्र रामगोपाल वर्मा यात यामी गौतमला घेण्यास उत्सूक असल्याची खबर आहे. यामीला या चित्रपटाचा प्रस्ताव देण्यात आल्याचे कळते. अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण ही बातमी खरी असेल तर यामीची लॉटरीच लागली म्हणायची.