WWE स्टार जॉन सीना झाला शाहरुख खानचा जबरा फॅन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 14:40 IST2018-07-12T14:39:44+5:302018-07-12T14:40:20+5:30

WWE चॅम्पियन जॉन सीना हे नाव तसं भारतीय फॅन्ससाठी नवं नाहीये.

WWE champion John Cena shares Shahrukh Khans quote, Srk thanks him | WWE स्टार जॉन सीना झाला शाहरुख खानचा जबरा फॅन 

WWE स्टार जॉन सीना झाला शाहरुख खानचा जबरा फॅन 

मुंबई : WWE चॅम्पियन जॉन सीना हे नाव तसं भारतीय फॅन्ससाठी नवं नाहीये. जॉनचे भारतात लाखोंच्या संख्येने फॅन्स आहेत. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्याचा धक्का बसेल की, जॉन सनी हा बॉलिवूड किंग शाहरूख खान याचा फॅन आहे. 



 

जॉन सीना याने एका मुलाखतीत शाहरूख खानचं चांगलंच कौतुक केलं. जॉन सीना हा सोशल मीडियात वेगवेगळे प्रेरणादायी संदेश शेअर करण्यासाठीही प्रसिद्ध आहे. सोमवारी जॉनने सुद्धा एक प्रेरणादायी संदेश शेअर केला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा संदेश शाहरूख खानचा विचार आहे. जॉनने याआधी राहुल द्रविडचेही कोट्स सोशल मीडियात शेअर केले होते. 



 



 

जॉन सीनाने आपल्या ट्विटर हॅंडलवर शाहरूख खानचा एक कोट शेअर केलाय. यासाठी शाहरूख खान याने जॉनचे आभारही मानले. त्यावर जॉन रिप्लाय देताना म्हणाला की, तुझे कोट्स(विचार) आणि तुझ्या कामाची पोहोच खूप लोकांपर्यंत आहे. तुझे विचार हसायला, विचार करायला आणि पुढे जाण्यास मदत करतात. धन्यवाद!

Web Title: WWE champion John Cena shares Shahrukh Khans quote, Srk thanks him