Wow! सलमान खान बनणार ‘बजरंगी’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2017 17:16 IST2017-04-11T11:46:48+5:302017-04-11T17:16:48+5:30
सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात सलमान हनुमानाचा भक्त बनला होता. जो ना खोटे बोलत,ना कुणाचे वाईट चिंतत. पण आता एक नवी बातमी आहे. होय, हनुमानाचा भक्त बनल्यानंतर आता सलमान स्वत: हनुमानाची भूमिका साकारणार आहे.
.jpg)
Wow! सलमान खान बनणार ‘बजरंगी’!!
स मान खानचा ‘बजरंगी भाईजान’ हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात सलमान हनुमानाचा भक्त बनला होता. जो ना खोटे बोलत,ना कुणाचे वाईट चिंतत. पण आता एक नवी बातमी आहे. होय, हनुमानाचा भक्त बनल्यानंतर आता सलमान स्वत: हनुमानाची भूमिका साकारणार आहे. आश्चर्यचकित झालात?
दिग्दर्शक सुुधीर मिश्रा हे वीर हनुमान यांचावर एक अॅनिमेशन चित्रपट बनवत आहेत. ‘हनुमान द दमदार‘ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटातील हनुमानाच्या अॅनिमेटेड पात्राला सलमानने स्वत:चा आवाज दिला आहे. केवळ इतकेच नाही तर या चित्रपटात सलमान ‘मैं हूं हनुमान तेरा’असे गुणगुणतानाही दिसणार आहे. होय, हे अगदी खरे आहे. या चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर रिलीज झाले आहे.
निश्चितपणे सलमानच्या चाहत्यांसाठी हे मोठे सरप्राईज आहे. सलमानआधी अनेक बॉलिवूड कलाकारांनी अॅनिमेटेड पात्रांना आपला आवाज दिला आहे. अलीकडे आलेल्या सुपरडुपर हिट ‘द जंगलबुक’ या चित्रपटात अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने नागीन(का) हिला आवाज दिला होता. तर इरफान खान याने या चित्रपटातील बल्लू(अस्वल) या पात्राला आवाज दिला होता. अक्षय कुमारनेही ‘जंबो- दी एलिफंट’ या चित्रपटातील जंबो या पात्राला स्वत:चा आवाज दिला होता.
सलमान खान सध्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात तो कॅटरिना कैफ हिच्यासोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. २०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा हा सीक्वल आहे. त्यामध्येदेखील सलमान आणि कॅटरिना ही जोडी मुख्य भूमिकेत होती. तब्बल पाच वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करीत आहे. लवकरच सलमानचा ‘ट्यूबलाईट’ हा सिनेमा प्रदर्शित होतो आहे.