देव्हाऱ्यात 'बडे मिया छोटे मिया'च्या पोस्टरची पूजा! अक्षयच्या फॅनचा व्हिडीओ गाजतोय, तुम्हीही बघा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 11:16 IST2024-04-11T11:15:56+5:302024-04-11T11:16:43+5:30

'बडे मिया छोटे मिया' सिनेमाच्या पोस्टरची पूजा करुन अक्षय कुमारच्या फॅनचा व्हिडीओ व्हायरल झालाय. बातमीवर क्लिक करुन तुम्हीही बघा (bade miyan chote miyan, akshay kumar)

Worship the poster of 'Bade Mia Chote Mia' The video of Akshay's fan is going viral | देव्हाऱ्यात 'बडे मिया छोटे मिया'च्या पोस्टरची पूजा! अक्षयच्या फॅनचा व्हिडीओ गाजतोय, तुम्हीही बघा

देव्हाऱ्यात 'बडे मिया छोटे मिया'च्या पोस्टरची पूजा! अक्षयच्या फॅनचा व्हिडीओ गाजतोय, तुम्हीही बघा

अक्षय कुमार - टायगर श्रॉफ यांच्या 'बडे मिया छोटे मिया' सिनेमाची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. अक्षय-टायगरच्या अॅक्शनपॅक सिनेमा चर्चेत आहे. आज 'बडे मिया छोटे मिया' सिनेमा संपूर्ण भारतात रिलीज होतोय. गेल्या अनेक दिवसांपासून रील्स, गाणी अशा विविध माध्यमांतून हा सिनेमा प्रेक्षकांची उत्सुकता चाळवत आहे. अशातच 'बडे मिया छोटे मिया' सुपरहिट व्हावा म्हणून अक्षयच्या फॅनने थेट देव्हाऱ्यात सिनेमाच्या पोस्टरची पूजा केलीय. 

'बडे मिया छोटे मिया' सिनेमाविषयी एक व्हिडीओ समोर आलाय. यात कोल्हापूरच्या एका फॅनने त्याच्या घरातील देव्हाऱ्यात 'बडे मिया छोटे मिया' चं पोस्टर ठेवलंय. इतकंच नव्हे तर दिवे लावून पोस्टरची पूजाही केलेली दिसली. 'बडे मिया छोटे मिया' सुपरहिट व्हावा म्हणून फॅनने गाऱ्हाणं घातलेलं दिसलं. अक्षय कुमारच्या फॅनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. 

'बडे मिया छोटे मिया' सिनेमाविषयी.. अक्षय कुमार आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलं आहे. वासू भगनानी, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफर हे सिनेमाचे निर्माते आहेत.  आज 11 एप्रिल 2024 रोजी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Worship the poster of 'Bade Mia Chote Mia' The video of Akshay's fan is going viral