अन् कास्टिंग काउचच्या विरोधात अभिनेत्रीने रस्त्यावर उतरवले कपडे; टॉपलेस होऊन केले आंदोलन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 13:19 IST2018-04-08T07:49:01+5:302018-04-08T13:19:01+5:30
चित्रपटसृष्टीत करिअर करू इच्छिणा-यांना अनेकांना कास्टिंग काउचचा सामना करावा लागतो. अनेक अभिनेत्री यावर बोलल्यात. पण याच्याविरोधात रस्त्यावर उतरण्याची हिंमत ...

अन् कास्टिंग काउचच्या विरोधात अभिनेत्रीने रस्त्यावर उतरवले कपडे; टॉपलेस होऊन केले आंदोलन!
च त्रपटसृष्टीत करिअर करू इच्छिणा-यांना अनेकांना कास्टिंग काउचचा सामना करावा लागतो. अनेक अभिनेत्री यावर बोलल्यात. पण याच्याविरोधात रस्त्यावर उतरण्याची हिंमत मात्र फार मोजक्या अभिनेत्रींनी दाखवली. तेलगू इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करत असलेली श्री रेड्डी या अभिनेत्रीने मात्र ही हिंमत दाखवली. कास्टिंग काउचच्या विरोधात तिने टॉपलेस होऊन आंदोलन केले.
![]()
श्री रेड्डीने तेलगू फिल्म चेंबरकडे कास्टिंग काउचबाबत तक्रार केली होती. पण फिल्म चेंबरने तिच्या तक्रारीची कुठलीही दखल घेतली नाही. अखेर श्री रेड्डीने फिल्म चेंबरबाहेरचं कॅमेºयासमोर टॉपलेस होण्याचा निर्णय घेतला. कॅमेºयासमोर तिने कपडे उतरवणे सुरू केले. तिचे ते कृत्य पाहून सगळीकडे खळबळ माजली. काही क्षणात पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी श्री रेड्डीला तेथून बाजूला केले.
![]()
यावेळी तिने कास्टिंग काउचमध्ये अडकलेल्या अनेक बड्या नावांचा खुलासा करण्याची घमकी दिली. तेलगू फिल्म इंडस्ट्री माझ्यासारख्या अभिनेत्रींना संधी नाकारली जाते.मला तेलगू फिल्म चेंबरची सदस्यत्व हवे आहे. पण चेंबर मला सदस्यत्व देण्यास तयार नाही.मी काम मागितले की, न्यूड फोटो आणि व्हिडिओची मागणी केली जाते. केवळ ही मागणी पूर्ण करत नसल्याने मला संधी नाकारली जात आहे, असा आरोप श्री रेड्डीने यावेळी केला.
सुमारे आठवडाभरापूर्वी श्री रेड्डीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये एका दिग्गज तेलगू दिग्दर्शकावर आरोप केले होते. हा बडा दिग्दर्शक काही दिवसांपासून माझ्या घरासमोर घिरट्या घालत असल्याचे तिने म्हटले होते. शिवाय त्या दिग्दर्शकावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. तो मला व्हिडिओ कॉल करायला सांगतो, असेही ती म्हणाली होती.