विल्यम शेक्सपिअर मला भावतो: आमीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 15:58 IST2016-05-24T10:28:05+5:302016-05-24T15:58:05+5:30

‘आपण दहावीत असताना पहिल्यांदा विल्यम शेक्सपिअर वाचला. ज्युलिअस सिझर वाचताना माझे जग खुले झाले. त्यापूर्वी मला काहीही माहिती नव्हते. ...

William Shakespeare Feels Like Me: Amir | विल्यम शेक्सपिअर मला भावतो: आमीर

विल्यम शेक्सपिअर मला भावतो: आमीर

पण दहावीत असताना पहिल्यांदा विल्यम शेक्सपिअर वाचला. ज्युलिअस सिझर वाचताना माझे जग खुले झाले. त्यापूर्वी मला काहीही माहिती नव्हते. माझा पहिला चित्रपट कयामत से कयामत तक हा रोमिओ आणि ज्युलिएट यांच्यापासून प्रेरणा घेतलेला होता, असे आमीर खानने म्हटले.
आमीर खान आणि सर इयान मॅकेलन यांच्या हस्ते मामी फिल्म क्लबचे उद्घाटन झाले. २५ ते २९ मे दरम्यान हा सोहळा होणार आहे. बॉलीवूड सुपरस्टार आमीर खान आणि सर इयान मॅकेलन यांनी काम, त्याचप्रमाणे विल्यम शेक्सपिअर यांच्या साहित्यासंदर्भात चर्चा केली. मुंबई अकॅडमी आॅफ मुव्हिंग इमेजेस (मामी) फिल्म क्लबची सुरुवात या दोघांच्या हस्ते करण्यात आली. 
विल्यम शेक्सपिअर यांच्या ४०० व्या पुण्यतिथीनिमित्त मामीने या दोघांना आमंत्रित केले होते. ब्रिटीश कौन्सिल आणि ग्रेट ब्रिटन कॅम्पेन यांच्या सहकार्याने ‘शेक्सपिअर लाईव्ह’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विल्यम शेक्सपिअर यांच्या नाटकाविषयी बोलताना इयान म्हणाले, शेक्सपिअर यांच्या बाबतीत जुने असे काही नाही. केवळ वाचून अथवा वर्गात बसून, तुम्हाला शेक्सपिअर कळणार नाहीत. योग्य अभिनेते, दिग्दर्शक, थिएटर, चित्रपट या विविध माध्यमांद्वारे तुम्हाला शेक्सपिअर पहावे लागतील. त्यांच्या आधुनिकीकरण आणि इतर गोष्टी आजही लागू पडतात. त्यांचे काम जगभर असल्याचे इयान म्हणाले.
यावेळी कंगना राणावत, सोनम कपूर, इम्रान खान, किरण राव, कबीर खान, मिनी माथूर आणि राजकुमार राव हे उपस्थित होते.

Web Title: William Shakespeare Feels Like Me: Amir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.