सलमान खान 'किक 2' मध्ये दिसणार व्हिलनच्या भूमिकेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 12:20 IST2018-02-07T06:50:15+5:302018-02-07T12:20:15+5:30

अभिनेता सलमान खान सध्या आपला आगामी चित्रपट 'भारत' आणि 'रेस 3' मध्ये बिझी आहे. मिळालेल्या माहितीनुसार सलमान खान आता ...

Willan's role in Salman Khan's Kick 2 will be seen | सलमान खान 'किक 2' मध्ये दिसणार व्हिलनच्या भूमिकेला

सलमान खान 'किक 2' मध्ये दिसणार व्हिलनच्या भूमिकेला

िनेता सलमान खान सध्या आपला आगामी चित्रपट 'भारत' आणि 'रेस 3' मध्ये बिझी आहे. मिळालेल्या माहितीनुसार सलमान खान आता पुढच्या वर्षाच्या ख्रिसमसचे देखील बुकिंग केले आहे. सलमान खानचे 'किक 2' 2019च्या ख्रिसमसला रिलीज होणार आहे. साजिद नाडियाडवालाने 'किक 2'ची घोषणा केली आहे. किकच्या यशानंतर निर्माता या चित्रपटाचा सीक्वल बनवणार आहे. ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी ही माहिती ट्वीटरवरून दिली होती.  मिळालेल्या माहितीनुसार 'किक 2' च्या स्क्रिप्टवर काम झाले आहे. 2019 मध्ये हा चित्रपट फ्लोअरवर येणार आहे.  किकने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला होता. किक 2मध्ये सलमान नेगेटिव्ह भूमिकेत दिसणार असल्याचे कळतेयं.  तरण आदर्शने ट्वीट करताना लिहिले आहे,  सलमान खान आणि साजिद नाडियाडवाला यांची 'किक 2'साठी हात मिळवणी झाली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन  साजिद नाडियाडवाला करणार आहे. हा चित्रपट 2019 च्या ख्रिसमसला रिलीज होणार आहे. 

ALSO READ :  भाईजान सलमान खानला‘लडकी मिल गयी’, दबंग खानच्या ट्विटमुळे लग्नाच्या चर्चांना उधाण

सलमान खान सध्या 'रेस 3' आणि 'भारत'ला घेऊन चर्चेत आहे. नुकतेच सलमानने 'रेस 3'च्या शूटिंगचे पहिले शेड्यूल मुंबईत पूर्ण केले आहे. 'रेस 3' मध्ये सलमानसोबत जॅकलिन फर्नांडिस दिसणार आहे. हा चित्रपट 15 जूनला ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. 'रेस 3' मध्ये बॉबी देओल आणि डेजी शाहची देखील महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपट भारत बद्दल बोलायचे झाले तर त्याचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करतो आहे.  अभिनेता व निर्माता अतुल अग्निहोत्री (सलमानची बहीण अलविरा खान हिचा पती) दीर्घकाळापासून या चित्रपटाचे प्लानिंग करतोय. सध्या या चित्रपटाची तयारी जोरात सुरु आहे.  यात सलमान 18 वर्षांचा दिसणार आहे. ‘मैने प्यार किया’मध्ये जो सलमान आपण पाहिलात, अगदी तसा सलमान ‘भारत’मध्ये आपल्याला दिसणार आहे. या टेक्निकसंदर्भात मेकर्सनी व्हिएफएक्स टीमसोबत चर्चा केली.आता यंग दिसायचे तर वजनही कमी करणे आलेच. त्यानुसार, पुढच्या काही आठवड्यात सलमानला वजनही कमी करावे लागणार आहे.  

Web Title: Willan's role in Salman Khan's Kick 2 will be seen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.