गौरी खानला दिलेल वचन शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा विसरणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2017 17:55 IST2017-01-02T17:22:47+5:302017-01-02T17:55:14+5:30

अभिनेत्री प्रियांका  चोप्राडासाठी 2016 हे वर्ष लक्की ठरले. प्रियांका 2016मध्ये तिने हॉलिवूडमध्ये पर्दापण केलेच तर दुसऱ्या बाजूला निर्माती क्षेत्रातही ...

Will Shahrukh Khan and Priyanka Chopra forget about the promise given to Gauri Khan? | गौरी खानला दिलेल वचन शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा विसरणार का ?

गौरी खानला दिलेल वचन शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा विसरणार का ?

िनेत्री प्रियांका  चोप्राडासाठी 2016 हे वर्ष लक्की ठरले. प्रियांका 2016मध्ये तिने हॉलिवूडमध्ये पर्दापण केलेच तर दुसऱ्या बाजूला निर्माती क्षेत्रातही तिने आपले नशिब आजमावले. दोन्ही ठिकाणी प्रियांकाचा चांगले यश मिळाले. मायदेशात परत येताच प्रियांका एंट्री घेतली ती डायरेक्ट रेड कार्पेटवर. प्रियांका सध्या सगळ्या पार्टीजमध्ये हजेरी लावताना दिसते. आता प्रियांका आपल्याला बॉलिवूडमध्ये ही लवकरच दिसणार असल्याचे समजतेय. 

सूत्रांच्या माहितीनुसार प्रियांका संजय लीला बन्सालीच्या चित्रपटात काम करणार आहे. याचित्रपटात तिच्या बरोबर शाहरुख खान असल्याचे कळतेय. शाहरुखसोबत प्रियांकाने 2011मध्ये आलेल्या डॉन 2 या चित्रपटात शाहरुख आणि प्रियांकाने एकत्र काम केले होते. यानंतर दोघांनी एकत्र काम केले नाही. डॉन2 या चित्रपटाच्या दरम्यान दोघांमध्ये अफेरची चर्चा सुरु झाली. शाहरुख आणि प्रियांकाच्या अफेरची चर्चा गौरी खानपर्यंत जाऊन पोहोचली होती. शाहरुख आणि प्रियांकाच्या अफेरमुळे गौरी शाहरुख पासून वेगळा होण्याचा विचार करत होती. यानंतर गौरीने शाहरुख आणि प्रियांका बाजावून सांगितले होते दोघांनी भविष्यात एकत्र काम करायच नाही. करण जोहरने मधस्थी करत हा वाद मिटवला होता. यानंतर प्रियांका आणि शाहरुखने एकाही चित्रपटात एकत्र काम केले नाही. 

संजय बन्साली कवी शाहिर लुधियानवी आणि कांदबरी लेखिका अमृता प्रीतम यांच्या यांच्या प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट असणार आहे. यातील शाहिर लुधियानवी यांची भूमिका शाहरुख साकारावी तर अमृताची भूमिका प्रियांकाने अशी संजय लीला बन्सालीची इच्छा आहे. या चित्रपटाची स्क्रीप्ट संजयने शाहरुखला दिली आहे. आता शाहरुख हा चित्रपट करण्यास तयार झाला तर पुन्हा एकदा शाहरुख आणि प्रियांका यांची हॉट केमिस्ट्री आपल्याला पडद्यावर दिसेल.  

Web Title: Will Shahrukh Khan and Priyanka Chopra forget about the promise given to Gauri Khan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.