शाहिद कपूर त्याच्या आगामी चित्रपटात एक्स गर्लफ्रेंडसोबत करणार रोमान्स?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 03:58 PM2018-01-27T15:58:59+5:302018-01-27T21:30:07+5:30

काही काळापूर्वीच ही बातमी समोर आली होती की, अभिनेता शाहिद कपूर लवकरच दिग्दर्शन इम्तियाज अली यांच्या नव्या चित्रपटाला सुरुवात ...

Will Shahid Kapoor romance with his X-Girlfriend in his forthcoming film? | शाहिद कपूर त्याच्या आगामी चित्रपटात एक्स गर्लफ्रेंडसोबत करणार रोमान्स?

शाहिद कपूर त्याच्या आगामी चित्रपटात एक्स गर्लफ्रेंडसोबत करणार रोमान्स?

googlenewsNext
ही काळापूर्वीच ही बातमी समोर आली होती की, अभिनेता शाहिद कपूर लवकरच दिग्दर्शन इम्तियाज अली यांच्या नव्या चित्रपटाला सुरुवात करणार आहे. ‘जब वी मेट’नंतर हे दोघे पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. मात्र इम्तियाज अलीच्या या नव्या चित्रपटात शाहिदसोबत कोणती अभिनेत्री रोमान्स करणार हे मात्र स्पष्ट केले गेले नसल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये हे जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता लागली होती. दरम्यान, आता याविषयीची माहिती समोर येत असून, शाहिद त्याच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत झळकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

बॉलिवूडमध्ये ज्या पद्धतीने सध्या चर्चा रंगत आहे, त्यावरून इम्तियाज अलीचा हा चित्रपट ‘जब वी मेट’चा सीक्वल असावा. इम्तियाजने या चित्रपटासाठी अभिनेत्री करिना कपूर-खानबरोबर चर्चाही केली आहे. वास्तविक करिनाने अद्यापपर्यंत इम्तियाजला होकार दिला नाही. एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात असलेली ही जोडी त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच फेव्हरेट राहिली आहे. त्यामुळे हे दोघे पुन्हा एकत्र यावेत अशी इम्तियाज अलीची इच्छा आहे. खरं तर ज्यापद्धतीने दोघांमध्ये प्रेमप्रकरण बहरले होते, त्यावरून हे दोघे विवाहाच्या बंधनात अडकतील असेच काहीसे चित्र होते. मात्र दोघांनी त्यांच्यातील नातेसंबंध संपुष्टात आणत चाहत्यांना चांगलाच धक्का दिला. 



दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याने हे दोघे पुन्हा एकत्र येतील याची शक्यता खूपच धुसर होती. मात्र या दोघांनी जे झाले ते विसरून ‘उडता पंजाब’मध्ये काम करीत अनेकांना एकप्रकारचा धक्का दिला. वास्तविक या चित्रपटात दोघांचा एकही सीन एकत्रित चित्रित केला गेला नाही. त्यामुळे करिना इम्तियाज अली यांना या चित्रपटासाठी होकार देईल अशी दाट शक्यता आहे. दरम्यान, इम्तियाज अली यांनी त्यांच्या या आगामी चित्रपटाबद्दल बोलताना म्हटले की, मी आणि शाहिद एकत्र काम करण्याचा विचार करीत होतो. मला पूर्ण अपेक्षा आहे की, या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात केली जाईल. तसेच याविषयीची लवकरच अधिकृत घोषणाही केली जाईल. 

पुढे बोलताना इम्तियाज यांनी सांगितले की, हे सर्व सुरू होण्यासाठी अगोदर सर्व गोष्टी जुळून येणे गरजेचे आहे. यावेळी जेव्हा इम्तियाजला करिनाविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यांनी म्हटले की, ‘हा विचार अद्यापपर्यंत माझ्या डोक्यात आला नाही. आम्ही अजूनपर्यंत यावर विचार केला नाही.’ मात्र सूत्रानुसार इम्तियाजने या चित्रपटाबद्दल करिनाला अगोदरच विचारणा केल्याचे समजते. 

Web Title: Will Shahid Kapoor romance with his X-Girlfriend in his forthcoming film?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.