स ध्या धडाधड चित्रपटांचे सिक्वेल येत आहेत. बर्याच सुपरहीट चित्रपटांचे रिमेक ...
'खलनायक'चा सिक्वेल येणार ?
/> स ध्या धडाधड चित्रपटांचे सिक्वेल येत आहेत. बर्याच सुपरहीट चित्रपटांचे रिमेक बनवण्याची तयारी सध्या इंडस्ट्रीमध्ये सुरू आहे. यातच सध्या १९९३ चा सुपरहीट चित्रपट 'खलनायक'चाही रिमेक होणार अशी हवा झाली आहे. निर्माते सुभाष घई यांच्या प्लॅनिंगनुसार सगळे काही ठीक झाले तर पुन्हा एकदा 'खलनायक' आपल्या भेटीला येऊ शकतो. या चित्रपटातील 'चोली के पिछे ' हे गाणेही जबरदस्त हिट झाले होते. माधूरी दिक्षित आणि ज्ॉकी श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका असणार्या या चित्रपटात संजय दत्तने खलनायकाचे पात्र मोठय़ा ताकदीने साकारले होते. सुभाष घई पुढच्या वर्षी या चित्रपटाचा सिक्वेल बनवू शकतात. पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा संजय दत्तला जेल मधून सुटका मिळेल. संजुबाबा सध्या अवैध हत्यार बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगत आहे.