​खरचं येणार का ‘अंदाज अपना अपना’चा सिक्वल??

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 19:39 IST2016-06-15T14:09:51+5:302016-06-15T19:39:51+5:30

‘अंदाज अपना अपना’!! सुमारे २२ वर्षांपूर्वी आलेला हा विनोदी चित्रपट आजही बॉलिवूड प्रेमींच्या मनात जिवंत आहे. आमीर खान, सलमान ...

Will the reality of 'Aap apne apna' sequel? | ​खरचं येणार का ‘अंदाज अपना अपना’चा सिक्वल??

​खरचं येणार का ‘अंदाज अपना अपना’चा सिक्वल??

ंदाज अपना अपना’!! सुमारे २२ वर्षांपूर्वी आलेला हा विनोदी चित्रपट आजही बॉलिवूड प्रेमींच्या मनात जिवंत आहे. आमीर खान, सलमान खान, रविना टंडन, करिश्मा कपूर, शक्ती कपूर आणि परेश रावल यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आजही खळखळून हसवतो. ‘अंदाज अपना अपना’चा सिक्वल येतोय, अशी बातमी आहे. पण कदाचित ही बातमीही अफवाच ठरण्याची शक्यता आहे. कारण याआधीही अनेकदा ‘अंदाज अपना अपना’चा सिक्वल येतोय, अशा बातम्या आल्यात. पण प्रत्येकवेळी त्या अफवाच ठरल्या. ‘अंदाज अपना अपना’चे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी स्वत: आपण या चित्रपटाचा रिमेक बनवणार नसल्याचे यापूर्वीच एका मुलाखतीत सांगितले होते. ‘अंदाज अपना अपना’ने प्रेक्षकांना खळखळून हसवलयं..हा चित्रपट आणि त्याच्याआठवणी प्रेक्षकांच्या मनात तशाच जिवंत राहाव्यात अशीच माझी इच्छा आहे आणि त्यामुळेच या चित्रपटाचा मी कधीही सिक्वल वा रिमेक बनवणार नाही, असे संतोषी या मुलाखतीत म्हणाले होते. एवढेच नाही तर आमीर खान आणि सलमान खान  ‘अंदाज अपना अपना’साठी एकत्र आलेत. पण यापुढे ते असे एकत्र येण्याची शक्यता फार कमी आहे किंबहुना नाहीच, असेही संतोषी म्हणाले होते. कदाचित ते खरेही होते. त्याचमुळे गेल्या २२ वर्षांत  ‘अंदाज अपना अपना’चा सिक्वल वा रिमेक येतोय, अशा अनेक बातम्या आल्या. पण शेवटी त्या अफवाच ठरल्या. प्रेक्षकांना  ‘अंदाज अपना अपना’चा सिक्वल वा रिमेक पाहायला आवडेल का, हे सांगता येणार नाही. पण  ‘अंदाज अपना अपना’चा अंदाजच काही और होता आणि आहे, हे मात्र तेवढेच खरे!!

surprise

एक आठवण...
राजकुमार संतोषीचे दिग्दर्शन असलेल्या ‘अंदाज अपना अपना’चे काम तब्बल तीन वर्ष अडकले होते. चित्रपटातील कलाकार त्यांच्या इतर प्रोजेक्टमध्ये अडकल्यामुळे त्यांना या चित्रपटाला वेळ देता येत नव्हता. पण आमीरने या सर्वांना एकत्र आणले आणि अखेर १९९४मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ४०व्या फिल्मफेअर पुरस्कारात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट (विनय कुमार सिन्हा), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (राजकुमार संतोषी), सर्वोत्कृष्ट अभिनेता (आमीर खान) आणि सर्वोत्कृष्ट विनोद कलाकार (शक्ती कपूर) या विभागांमध्ये नामांकने मिळाली होती.

cheeky१९९४ मध्ये ‘अंदाज अपना अपना’आला. या चित्रपटाला तयार व्हायला तीन वर्षे लागली. ‘अंदाज अपना अपना’या चित्रपटात आमीर खान आणि सलमान खान या दोघांच्या आधीच्या चित्रपटांचासंदर्भ दिला गेला. म्हणजे आमीर जेव्हा तुरुंगात रिबीन कापतो, तेव्हा मागे ‘पापा कहते है’ हे आमीरच्या ‘कयामत से कयामत तक’(1988)या सुपरहिट चित्रपटातील गाणे वाजते. याचप्रमाणे रवीनाच्या घरच्या सलमानच्या एका सीनमध्ये ‘साजन’ चित्रपटातील ‘देखा है पहली बार..’ हे गाणे मागे वाजताना दिसते. बॉलिवूड मुव्हीचा रेफरन्स वापरून केलेली कॉमेडी या चित्रपटात दिसली. यापूर्वी कधीच असा प्रयोग झाला नव्हता. 
cheekyएका मुलाखतीत आमीर खानने ‘अंदाज अपना अपना’नंतर सलमानसोबत कधीही चित्रपट करणार नाही, असे म्हटले होते. सलमान सेटवर नेहमी उशीरा यायचा. यामुळे मी प्रचंड वैतागलो होतो आणि त्यानंतरच सलमानसोबत यापुढे कधीही काम करणार नसल्याचा निर्णय घेतला होता, असे आमीर या मुलाखतीत म्हणाला होता. योगायोग म्हणजे यानंतर आमीर व सलमान खरोखरचं एकत्र आले नाहीत.
cnxoldfiles/ class="responsive">‘अंदाज अपना अपना’मध्ये एका प्रसंगात, ‘तू शोले पाहिलास का?’ असा प्रश्न सलमानला विचारला जातो. यावर, हाँ, दस बार, असे उत्तर सलमान देता. याचवेळी आमीर खान गमतीने ‘इसके बाप ने लिखी है’ असे म्हणतो. हे खरे आहे. सलमान खानचे वडील सलीम खान हे ‘शोले’चे सहलेखक आहेत.

Web Title: Will the reality of 'Aap apne apna' sequel?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.