तर काय रणवीर सिंग व दीपिका पादुकोणही निवडणार ‘विरूष्का’सारखा ‘डेस्टिनेशन वेडिंग’चा पर्याय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 12:23 IST2018-02-07T06:53:50+5:302018-02-07T12:23:50+5:30
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या ‘पद्मावत’ची नको इतकी चर्चा झाली. आता चर्चा आहे ती या लव्हबर्ड्सच्या लग्नाची. होय, ...
.jpg)
तर काय रणवीर सिंग व दीपिका पादुकोणही निवडणार ‘विरूष्का’सारखा ‘डेस्टिनेशन वेडिंग’चा पर्याय?
र वीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या ‘पद्मावत’ची नको इतकी चर्चा झाली. आता चर्चा आहे ती या लव्हबर्ड्सच्या लग्नाची. होय, रणवीर व दीपिका लग्नाबद्दल सीरिअस असून यावर्षी दोघेही लग्नबंधनात अडकणार असल्याची खबर आधीच आली आहे. आता त्यानंतरची खबर आहे. होय, दीपिका व रणवीर म्हणे विराट कोहली व अनुष्का शर्मासारखेच डेस्टिनेशन वेडिंग करण्याच्या विचारात आहेत. होय, या डेस्टिनेशन वेडिंगची सध्या जोरात चर्चा आहे. हे डेस्टिनेशन वेडिंग कुठे होईल, तूर्तास याबद्दल ठोस माहिती नाही. पण रणवीर व दीपिका दोघांनाही समुद्र किनारा खूप आवडतो. त्यामुळे लग्नासाठी बीच वेडिंगचा पर्याय निवडला जाण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. या लग्नाला केवळ रणवीर व दीपिकाचे अतिशय जवळचे मित्र व नातेवाईक हेच तेवढे हजर असतील असेही कळतेय. सूत्रांच्या मते, लग्नानंतर दोन रिसेप्शन होतील. दीपिकाचे कुटुंब बेंगळुरूत राहते. त्यामुळे दीपिकाच्या नातेवाईकांसाठी एक रिसेप्शन बेंगळुरूत होईल. तर रणवीरचे नातेवाईक व बॉलिवूडच्या मित्रांसाठी दुसरे रिसेप्शन मुंबईत दिले जाईल.
विराट व अनुष्काने आपल्या लग्नासाठी इटलीची निवड केली होती. आता दीपिका व रणवीर कुठल्या देशाची व ठिकाणाची निवड करतात, ते बघूच.
तसे तर दीर्घकाळापासून दीपिका व रणवीर या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा होतेय. पण रणवीर किंवा दीपिका या दोघांनी कधीही अधिकृतपणे हे नाते मान्य केले नाही. मध्यंतरी हे कपल साखरपुडा करणार अशी खबर आली होती. पण तेव्हा साखरपुड्याची बातमीही खोटी ठरली. पण कदाचित आता योग्य वेळ आली आहे. यापूर्वी दीपिका व रणवीरच्या अतिशय जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने दीपिका व रणवीरने लग्नाचा निर्णय घेतला असल्याची बातमी आली होती. दीपिका व रणवीर दोघेही ‘पद्मावत’च्या रिलीजच्या प्रतीक्षेत होते. या चित्रपटात दोघांनीही साकारलेल्या संवेदनशील भूमिका बघता, दीपिका व रणवीरने ‘पद्मावत’ रिलीज होईपर्यंत संयम दाखवला. केवळ या चित्रपटामुळे दोघेही अंतर राखून होते. पण आता ‘पद्मावत’ रिलीज झाल्यानंतर दीपिका व रणवीर दोघेही आपले रिअल लाईफ रिलेशन लोकांसमोर मान्य करण्याच्या निर्णयाप्रत आले आहेत, असे या सूत्रांनी म्हटले होते.
ALSO READ : SEE PICS : ‘पद्मावत’पेक्षाही सुंदर आहे दीपिका पादुकोणचा हा नवा अंदाज!!